कोरोनाचे जिल्ह्यात दोन बळी; ७५५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:01 AM2021-03-13T05:01:14+5:302021-03-13T05:01:14+5:30
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरात ६७, सुंदरखेड चार, कोलवड सात, पिंपळगाव सराई पाच, खामगाव ४०, पिंपरी गवळी आठ, विहीगाव तीन, ...
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरात ६७, सुंदरखेड चार, कोलवड सात, पिंपळगाव सराई पाच, खामगाव ४०, पिंपरी गवळी आठ, विहीगाव तीन, हिवरा खु. चार, पोटळी तीन, टकारखेड पाच, महाळुंगी तीन, निमगाव सात, शेंबा तीन, जवळा बाजार दोन, मलकापूर चार, चिखली ६४, सावरगाव डुकरे तीन, किन्होळा चार, एकलारा तीन, ढासळवडी तीन, धानोरी दोन, खैरव १९, टकारखेड चार, वळती तीन, भानखेड दोन, सवडत दोन, मेंडगाव दोन, सोमठणा दोन, खंडाळा तीन, कोलारा तीन, अमडापूर तीन, सिं. राजा सात, साखरखेर्डा चार, विझोरा दोन, शेलगाव राऊत दोन, शेंदुर्जन तीन, जऊळका चार, गुंज तीन, पिंपरखेड एक, उऱ्हा दोन, पुन्हई दोन, धा. बढे चार, जनुना सात, सारोळा मारोती सात, मोताळा आठ, शेगाव ६२, चिंचोली चार, गौलखेड दोन, खेर्डा दोन, सोनाळा चार, जळगाव जामोद आठ, खांडवी दोन, आसलगाव पाच, धानोरा पाच, सूनगाव तीन, पिंपळगाव काळे दोन, दे. राजा ५७, सिनगाव जहागीर आठ, आळंद दोन, हिवरखेड चार, लोणार २७, नांद्रा दोन, मेहकर २२, मोळा दोन, हिवरा आश्रम पाच, दे. माळी दोन, कळमेश्वर सहा, सारंगपूर तीन, सोनाटी दोन, नांदुरा ५२ आणि यवतमाळ येथील एक, औरंगाबाद येथील एक, अकोला जिल्ह्यांतील कारंजा राम येथील एक, लोहारा येतील एक या प्रमाणे ७५५ कोरोनाबाधित आढळून आले.
दरम्यान, बुलडाणा शहरातील केशवनगरमधील ६५ वर्षीय महिला आणि मोताळा तालुक्यातील ६९ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे ४३२ जणांनी कोरोनावर मात केली.
--एकूण बाधितांचा आकडा २३,५४०--
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता २३ हजार ५४० झाली आहे. यापैकी ३,४४० सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. १९ हजार ८६२ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अद्यापही २,८४६ संदिग्धांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिले.