शहरातील मुख्य रस्त्यांवर आता पालिकेकडून दुतर्फा मार्किंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:50 PM2019-11-19T17:50:08+5:302019-11-19T17:50:14+5:30
पोलिस प्रशासनाचा पालिकेशी पत्रव्यवहार अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासोबतच रहदारीतील अडथळे कमी करण्यासाठी ...
पोलिस प्रशासनाचा पालिकेशी पत्रव्यवहार
अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासोबतच रहदारीतील अडथळे कमी करण्यासाठी शहर पोलिस प्रशासनाच्यावतीने रस्त्याच्या दुतर्फा मार्कींग करण्यात आले. मुख्य बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत होण्यास यामुळे मदत झाली. त्यामुळे शहरातील प्रमुख आणि बाजारपेठेतील रस्त्यावर आता नगर पालिका प्रशासनाच्यावतीने मार्कींग करण्यात येणार आहे.
खामगाव शहर अंत्यत संवेदनशील असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. शहरातील काही रस्त्यांवर पोलिस प्रशासनाकडून दुतर्फा आखणी करण्यात आली. त्यानंतर आता शहरातील इतर मुख्य रस्ते, बाजारपेठ रस्ते, वर्दळीची ठिकाणे आणि व्यापारी संकुल, शाळा आणि महाविद्यालयासमोरील रस्त्यांवर दुतर्फा पांढºया रेषेची आखणी करून देण्यासाठी पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
चौकट...
अस्तावस्त पार्कींगलाही लागणार शिस्त!
शहरातील अस्ताव्यस्त पार्कींगला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिस प्रशासन आणि नगर पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न केल्या जाणार आहेत. पालिकेने रस्त्याच्या दुतर्फा पांढºया रेषांची आखणी केली जाईल. त्यानंतर या रेषेबाहेर वाहनं पार्कींग करणाºया वाहन धारकांविरोधात वाहतूक नियमाअन्वये कारवाई केली जाईल.
शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिस प्रशासनाकडून गत आठवड्यात दुतर्फा मार्कींग करण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाल्याने, शहरातील इतर रस्त्यांवर दुतर्फा पांढºया रेषांची आणखी करून देण्यासाठी पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे.
- सुनील अंबुलकर
निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन खामगाव.