खामगावात दुचाकी आणि चारचाकीला बंदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 04:54 PM2020-04-01T16:54:36+5:302020-04-01T16:54:44+5:30
दुचाकी आणि चारचाकी वाहनांना लॉकडाऊन काळात बंदी घालण्यात आल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी दिली आहे.
Next
ल कमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिस विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये अत्यावश्यक सुविधांची वाहतूक करणाºया परवानाधारक वाहनांना सोडून शहरातील सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांना लॉकडाऊन काळात बंदी घालण्यात आल्याची माहिती शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी दिली आहे. संपूर्ण जगात कोरोना या विषाणूजन्य आजाराने खळबळ माजविली आहे. त्याचप्रमाणे देशात आणि राज्यात कोरोना संसर्गने मोठ्या प्रमाणावर पाय पसरले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. देशात दिवसेंदिवस कोरोनाने बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाकडून अनेक मोठी जिल्हे पूर्णत: बंद करण्यात आली आहे. याच अनुषंगाने पोलीस विभागानेही नियम कडक केले आहे. १ एप्रिलपासून लॉकडाऊन काळात शहरात सर्व दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी ज्या वाहनांना पास दिली आहे. अशा वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी राहणार आहे. या व्यतिरिक्त जी वाहने शहरात फिरताना आढळून येतील त्यांचेवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर नागरिकांनी भाजी, दूध, औषधे त्यांच्या परिसरातील दुकानांमधून पायी जाऊन आणावे असेही शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर यांनी स्पष्ट केले आहे. शहरात नागरिकांची धरपकड!शहरात विनाकारण फिरणाºया नागरिकांची तसेच युवकांची पोलिस प्रशासनाकडून धरपकड करण्यात येत आहे. आतापर्यंत २१ जणांविरोधात भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शहरात कुणीही विनाकारण फिरू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.