दुचाकी चाेरट्यांची टाेळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:52 AM2021-02-23T04:52:31+5:302021-02-23T04:52:31+5:30
बुलडाणा : दुचाकी लंपास करणारी टाेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड करून त्यांच्याकडून दाेन देशी कट्ट्यांसह सात जिवंत काडतुसे ...
बुलडाणा : दुचाकी लंपास करणारी टाेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड करून त्यांच्याकडून दाेन देशी कट्ट्यांसह सात जिवंत काडतुसे जप्त केली. पाेलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या टाेळीला अटक करून पाेलिसांनी १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाने गस्तीवर असताना सोमनाथ बाबूराव सावळे (रा. डोंगरशेवली ता. जि. बुलडाणा ह.मु. मांजरी खुर्द ता. हवेली जि. पुणे) यास वरवंड फाटा येथे अटक केली हाेती. त्याची तपासणी करून त्याच्याकडून दाेन देशी कट्टे, ७ जिवंत काडतुसे, एक स्कूटी व एक मोबाइल असा दाेन लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला हाेता. त्याची पाेलिसांनी कसून चाैकशी केली असता गोपाल कोंडू चव्हाण, मयूर अनिल राठोड, शैलेश सुरेश जाधव (तिन्ही रा. डोंगरखंडाळा ता. जि. बुलडाणा) व मंगेश
बबन जेऊघाले वय (रा. वरवंड) यांची नावे समाेर आली. पाेलिसांनी पाचही जणांना अटक केली. त्यांनी बुलडाणा व पुणे जिल्ह्यात मागील वर्षभरापासून विविध कंपन्यांच्या बऱ्यास दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली. या दुचाकी मनिष बाबूराव जाधव रा. बुलडाणा, संदीप नामदेव गावंडे रा. डोंगरखंडाळा, स्वप्निल राजेंद्र गायकवाड रा. वरवंड, दत्तात्रय देवराव जेऊघाले रा. वरवंड, पांडुरंग लालसिंग जाधव रा. करवंड, कोंडू गोबा चव्हाण रा. डोंगरखंडाळा यांच्याकडून पाेलिसांनी जप्त केल्या. पाचही आराेपींकडून पाेलिसांनी दाेन देशी कट्टे, ७ जिवंत काडतुसे, एक स्कूटी, मोबाइल फोन व १३ दुचाकी असा १५ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या चाेरट्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील ११ गुन्हे व पुणे जिल्ह्यातील चोरीचे एकूण ६ गुन्हे असे एकूण १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, हेमराजसिंग राजपूत, अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनात
पो.नि. बळीराम गिते यांच्या आदेशान्वये पोउपनि नीलेश शेळके, पाेलीस उपनिरीक्षक प्रदीप आढाव व पोलीस अंमलदार सुधाकर काळे, दीपक पवार, सुनील खरात, गणेश शेळके, युवराज शिंदे व चालक राहुल बोडे यांनी केली.