भरधाव कंटेनरची दुचाकीस धडक, दाेन ठार; छत्रपती संभाजीनगर-नागपूर राज्यमहामार्गावरील घटना
By संदीप वानखेडे | Published: March 3, 2024 02:26 PM2024-03-03T14:26:03+5:302024-03-03T14:26:17+5:30
अंजनी खुर्दकडून दुचाकी क्र. एमएच ३७ सी ६८३७ ने रामेश्वर श्रीराम कांबळे रा. देऊळगाव कोळ व पंडित किसन भारसाकळे रा. काडवी तसेच एक आठ वर्षीय मुलगा हे आठ वर्षीय मुलगा बिबीकडे जात हाेते़.
अंजनी खुर्द : भरधाव कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने दाेन जण जागीच ठार तर एक आठ वर्षीय मुलगा जखमी झाले़ ही घटना २ मार्च राेजी रात्री छत्रपती संभाजीनगर-नागपूर राज्यमहामार्गावर घडली़ रामेश्वर श्रीराम कांबळे (वय ३२), रा. देऊळगाव कोळ (ता. सिंदखेडराजा)व पंडित किसन भारसाकळे (वय ५५), रा. काडवी (ता. परतूर) अशी मृतकांची नावे आहेत़.
अंजनी खुर्दकडून दुचाकी क्र. एमएच ३७ सी ६८३७ ने रामेश्वर श्रीराम कांबळे रा. देऊळगाव कोळ व पंडित किसन भारसाकळे रा. काडवी तसेच एक आठ वर्षीय मुलगा हे आठ वर्षीय मुलगा बिबीकडे जात हाेते़. दरम्यान, अंजनी खुर्दनजीक एका हॉटेलजवळ दुचाकीला कंटेनरक्र. एमएच-४० वाय १८५६ ने समाेरासमाेर धडक दिली़ यामध्ये रामेश्वर कांबळे व पंडित भारसाकळे या दोघांचा मृत्यू झाला. परंतु आठ वर्षीय मुलगा हा सुदैवाने बचावला. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोस्टेचे हेडकॉ. लक्ष्मण कटक यांनी घटनास्थळावर धाव घेवून जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून मेहकर येथे दाखल केले. मात्र डॉक्टरानी दोघांना मृत घोषित केले. या अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून फरार झाला हाेता़ या प्रकरणी पुढील तपास मेहकर पाेलीस करीत आहेत़.