पुलावरून दुचाकी खाली पडली; खामगाव येथील पिता-पुत्र बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 04:56 PM2018-10-13T16:56:14+5:302018-10-13T16:56:29+5:30

नांदुरा :  राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर धानोरा विटाळी नजीक वाहनाची  धडक लागल्याने दुचाकी पुलावरून खाली पडली. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता घडली.

A two-wheeler fell down from the bridge; Khamgaon's father and son survived | पुलावरून दुचाकी खाली पडली; खामगाव येथील पिता-पुत्र बचावले

पुलावरून दुचाकी खाली पडली; खामगाव येथील पिता-पुत्र बचावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदुरा :  राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर धानोरा विटाळी नजीक वाहनाची  धडक लागल्याने दुचाकी पुलावरून खाली पडली. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता घडली. या अपघातातखामगाव येथील पिता-पुत्र जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी मलकापूरकडून खामगावकडे जात असलेले राजेश रत्नपारखी (वय ५०) व त्यांचा मुलगा सागर रत्नपारखी (वय २८) रा. सिव्हील लाईन, खामगाव यांच्यादुचाकी क्र.एमएच२८-क्यु८९२२ ला वाहनाने धडक दिली. यामुळे धानोरा विटाळी ते काटी फाटा दरम्यानच्या पुलावरून सदर दुचाकी खाली कोसळली. यात दुचाकीस्वार पिता-पुत्रांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली असून सुदैवाने त्यांचे प्राण मात्र बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच  धानोरा येथील भावेश गावंडे, रामराव नरवाडे, सुपेश पाटील, छगन दांडगे यांनी जखमींना वर काढून तात्काळ मलकापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचारार्थ भरती केले.

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन महिन्यांपासून बंद असून सदर पुलाचे कठडे तुटलेले आहेत. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना कंत्राटदार कंपनीने केल्या नाहीत. यामुळे सदर अपघात घडला असल्याची चर्चा आहे. पुलाच्या नवीन अर्धवट बांधकामाच्या सळया (आसारी) उभ्या असून खामगाव येथील पितापुत्राचे दैव बलवत्तर असल्यानेच ते बचावले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  (प्रतिनिधी)

Web Title: A two-wheeler fell down from the bridge; Khamgaon's father and son survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.