घरासमोर उभी असलेली दुचाकी दिली पेटवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:29+5:302021-08-12T04:39:29+5:30
साखरखेर्डा : अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथील वाॅर्ड क्रमांक सहामध्ये राहणाऱ्या एकाची दुचाकी अज्ञात इसमाने जाळली. ही घटना ...
साखरखेर्डा : अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथील वाॅर्ड क्रमांक सहामध्ये राहणाऱ्या एकाची दुचाकी अज्ञात इसमाने जाळली. ही घटना ९ ऑगस्ट राेजी रात्री घडली. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सेवानिवृत्त लाइनमन श्यामराव इंगळे यांची घरासमोर उभी असलेली दुचाकी क्रमांक एमएच २८ एम ७१०८ अज्ञाताने सोमवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान पेटवून दिली. त्यामुळे सकाळी जेव्हा इंगळे कुटुंबीयांना जाग आली तेव्हा घरासमोर असलेली दुचाकी जळून पूर्णपणे खाक झालेली दिसली. या प्रकरणी श्यामराव इंगळे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दाखल केली. साखरखेर्डा पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे दुचाकीचे अंदाजे ३० ते ३५ हजार रुपयांची नुकसान झाले आहे. पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रामदास वैराळ करीत आहेत.