मेहकरमधून दोन वर्षीय बालक बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:03 IST2017-11-09T01:01:59+5:302017-11-09T01:03:03+5:30

मेहकरमधून दोन वर्षीय बालक बेपत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : स्थानिक जानेफळ मार्गावरील नवीन घरकुल वसाहतीतून दोन वर्षीय बालक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाले आहे. सकाळी ७ वाजतापासून तो बेपत्ता असून, त्याचा सध्या नातेवाईक तथा पोलीस शोध घेत आहेत.
सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेख नवाज शेख इरफान कुरेशी हा बालक घरालगतच असलेल्या किराणा दुकानावर गेला होता; पण तो परत न आल्याने सकाळपासूनच त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला; मात्र तो सापडला नाही. त्यामुळे याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात शेख नवाज शेख इरफान कुरेशी बेपत्ता झाला असल्याची तक्रार देण्यात आली आहे. रफिक कुरेशी यांचा तो भाचा आहे. तो कुणाला दिसून आल्यास लगतच्या पोलीस ठाण्याला माहिती देण्यात यावी, असे आवाहन मेहकरचे ठाणेदार आत्माराम प्रधान आणि रफीक कुरेशी यांनी केले आहे. नातेवाइकांनी शेख नवाज शेख इरफान कुरेशीचा दिवसभर शोध घेतला; पण तो सापडला नाही. त्यामुळे पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.