दोन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाक्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:43 IST2017-09-22T00:43:20+5:302017-09-22T00:43:20+5:30
साखरखेर्डा : बांधकाम सुरू असलेल्या घराजवळील हौदातील पाण्यात पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना १९ सप्टेंबर, मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.

दोन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाक्यात बुडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : बांधकाम सुरू असलेल्या घराजवळील हौदातील पाण्यात पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना १९ सप्टेंबर, मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.
येथील गजानन साहेबराव पारधे यांच्या घरकुल योजनेतील घराचे बांधकाम टेलिफोन कार्यालयासमोरील भागात सुरू आहे. घराचे बांधकाम काही प्रमाणात झालेले आहे. त्यामध्ये साहेबराव पारधे यांचे जावई कैलास धोंगडे व मुलगी सविता रा.सारशिव, ता. मेहकर हे राहतात. सकाळी कैलास धोंगडे हे कामावर गेले होते तर त्यांची पत्नी सविता ही आपल्या दोन वर्षे वयाचा मुलगा शिवम याला घेऊन कपडे धुण्यासाठी घरापासून थोड्या अंतरावर गेल्या होत्या. तेथून खेळताना शिवम हा आपल्या घराकडे परतला व घरामागे खोदलेल्या हौदाकडे गेला. हौदात पावसामुळे पाणी साचलेले आहे. त्यामध्ये पडून बुडाल्याने शिवमचा मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.