व्हॉट्सॲपवरून विनयभंगाचे प्रकार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:22 AM2021-06-21T04:22:43+5:302021-06-21T04:22:43+5:30
बुलडाणा तालुक्यात १६ कोरोना पॉझिटिव्ह बुलडाणा : तालुक्यात १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रविवारी आढळून आले आहेत. मध्यंतरी बुलडाणा शहर ...
बुलडाणा तालुक्यात १६ कोरोना पॉझिटिव्ह
बुलडाणा : तालुक्यात १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रविवारी आढळून आले आहेत. मध्यंतरी बुलडाणा शहर व तालुक्यातील बाधितांची संख्या कमी झाली होती. दिवसाला चार ते पाचच रुग्ण सापडत होते. परंतु तीन दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे.
फ्लेक्समुळे विद्रूपीकरणाकडे वाटचाल
बुलडाणा : परिसरामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणचे फ्लेक्स फाटले आहेत. केवळ सांगाडा दिसत आहे. मुख्य चौकातही फ्लेक्सची दुरवस्था झाली असल्याचे चित्र दिसत आहे, तर काही ठिकाणी फ्लेक्स अर्धवट तुटलेला आढळून येतो. फाटलेल्या फ्लेक्समुळे बुलडाणा शहराची विद्रूपीकरणाकडे वाटचाल दिसून येत आहे.
खासगी क्लासला हवा मदतीचा हात
बुलडाणा : लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या खासगी कोचिंग क्लासेस व्यावसायिकांना आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, आपत्ती प्रतिसाद निधी मदत व पुनर्वसन अंतर्गत आर्थिक मदत करावी, अशी मागणी खासगी कोचिंग क्लासेस व्यावसायिकांकडून होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खासगी कोचिंग क्लासेस गेल्या वर्षीपासून बंद आहेत. क्लासेस व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
वाहतूक कोंडीची समस्या सुटेना
मेहकर : शहरात वाहतूक समस्या अधिक बिकट बनत चालली आहे. वाहतूक समस्येसाठी अनेकजण अनधिकृत बांधकामांना दोष देताना दिसत आहेत. मात्र व्यापारी, नागरिक व वाहनचालकांमध्ये वाहतुकीविषयी उदासीनता दिसून येत आहे. वाहने रस्त्यामध्ये उभी करण्याची सवय याला कारणीभूत आहे.
दुसऱ्या लाटेत वाढले सर्वाधिक रुग्ण
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात ८६ हजार २०७ कोरोना पॉझिटिव्ह रुण आढळले असून, दोन लाटांमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूचे स्वरूप वेगळे होते. संसर्गाचे प्रमाण जास्त होते.
झाड पडल्याने वाहतुकीस अडचणी
डोणगाव : परिसरातील लोणी गवळी, आंध्रुड, शेलगाव, उमरा देशमुख या भागात वादळामुळे रस्त्यावर झाडे पडण्याचे प्रकार घडले आहेत. अचानक झाड उन्मळून पडल्याने रस्ता बंद झाला. वारंवार झाड पडण्याच्या घटनांमुळे वाहतुकीस अडचणी येत आहेत.
ओल्या मास्कने वाढली आरोग्याची समस्या
बुलडाणा : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. मात्र, पावसामुळे मास्क भिजत असून, ओला मास्क वापरल्याने नागरिकांच्या आरोग्यासह सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींचा प्रश्न
बुलडाणा : जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये गेल्या वर्षभरात अनेक विहिरी खचल्या आहेत. या विहिरींचे प्रस्ताव मग्रारोहयोंतर्गत दुरुस्तीकरिता पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे खचलेल्या विहिरींचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून धूळखात पडले आहेत.
सांडपाण्याच्या नाल्यातील झुडपे काढणार केव्हा
बुलडाणा : शहराच्या विविध भागातून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या नाल्या, घनकचरा अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने झाडझुडपे बेशरम वाढली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.