उद्धव ठाकरे गुरुवारी शेगावात
By admin | Published: June 13, 2017 12:16 AM2017-06-13T00:16:49+5:302017-06-13T00:16:49+5:30
बुलडाणा : शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी व पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतनगरी शेगावात येत आहेत.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे १५ जूनला संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी, शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी व पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतनगरी शेगावात येत आहेत.
या मेळाव्याला शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधी व शेतकरी बांधवांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी केले आहे.