उध्दव ठाकरे यांनी घेतले श्रींचे दर्शन

By admin | Published: June 15, 2017 07:35 PM2017-06-15T19:35:43+5:302017-06-15T19:35:43+5:30

शेगाव : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे गुरूवारी शेगावात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम संत गजानन महाराज मंदिरात जावून श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले.

Uddhav Thackeray took Shree's philosophy | उध्दव ठाकरे यांनी घेतले श्रींचे दर्शन

उध्दव ठाकरे यांनी घेतले श्रींचे दर्शन

Next

गजानन कलोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे गुरूवारी शेगावात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम संत गजानन महाराज मंदिरात जावून श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्यावतीने विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला महाराष्ट्र शासनाने तत्वत: मान्यता दिल्यानंतर शिवसेनेच्या लढ्याला यश प्राप्त झाल्याच्या पार्श्वभुमीवर श्रींच्या समाधीचे दर्शन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उध्दव ठाकरे गुरूवारी शेगावात दाखल झाले. आल्या आल्या त्यांनी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास श्रींचे दर्शन घेतले. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसुल राज्यमंत्री संजय राठोड, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खा. अरविंद सावंत मुंबई, खा. चंद्रकांत खैरे औरंगाबाद, खा. प्रतापराव जाधव, मुंबई मनपाचे महापौर विश्वनाथ महादेश्वर, खा. भावना गवळी, निलमताई गोऱ्हे, आ. संजय रायमुलकर, आ.शशिकांत खेडेकर, स्थानिक पदाधिकारी अविनाश दळवी, दिनेश शिंदे, आशिष गणगणे, संतोष घाटोळ, भावेश शर्मा, योगेश पल्हाडे, गजानन हाडोळे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Uddhav Thackeray took Shree's philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.