गरीबांची ‘उज्वला’ गॅसवरून पुन्हा चुलीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:58 AM2021-02-24T11:58:29+5:302021-02-24T11:58:42+5:30
Ujjwala scheme गॅसचे भाव गगणाला भिडल्याने उज्वला याेजनेचे ग्रामीण भागातील भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे हाेणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतुने केंद्र सरकारने उज्वला याेजनेंतर्गंत गॅसचे वितरण केले. मात्र, गत काही महिन्यात गॅसचे भाव गगणाला भिडल्याने तसेच सबसीडीही जवळपास बंदच झाल्याने उज्वला याेजनेचे ग्रामीण भागातील भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.
स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच 'बजेट"कोलमडत आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वनवन भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबून व वनांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या हेतुने केंद्र सरकारच्यावतीने पंतप्रधान उज्वला याेजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र, दरात हाेत असलेलेल वाढ लाभार्थीसाठी डोकेदुरवी ठरत आहे.
सिलिंडरचे दर गरीबांच्या आवाक्या बाहेर
उज्वला याेजनेंतर्गंत गॅस कनेक्शन माेफत मिळाले. काही महिने सबसीडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसीडी मिळत नसल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी जानेवारी २०२० मध्ये ७१४.५० रुपयांवर असलेले सिलिंडरचे दर जुलै २०२० पर्यंत कमी होत जाऊन ५९९.५० रुपयांवर आले होते.
जानेवारी २०२९ मध्ये हे दर ६९९.५० रुपयांवर पोहचले, त्यानंतर या महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१मध्ये सिलिंडरचे दर ७८९. ५० रुपयांवर पोहचले आहे.
गृहीनी म्हणतात चुलीवरच स्वयंपाक बरा...
उज्वला याेजनेंतर्गंत गॅस मिळाल्याने रवूप आनंद आला होता. मात्र, सिलिंडर खूप महाग झाल्याने आता तोंडचे पाणी पळाले आहे. महागडा गॅस वापरणे परवडत नसल्याने चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आपच्यासारख्यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने गॅसवरील सबसीडी वाढवण्याची गरज आहे.
- भारती बाहेकर, किन्हाेळा
गत काही महिन्यांपासून महागाइई माेठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वच वस्तुंचे भाव वाढत असताना गॅस सिलिंडरचे भावही वाढले आहे. दरररोज वाढत जाणारी पहागाई चिंतेची ठरत आहे. घरातील खर्च भागवितांना नाकीनऊ येत आहे. त्यात आता गॅस सिलिंडरचे दरही वाढत असल्याने गॅस वापरणे शक्य नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. -सारीका महाकाळ