उमाळा गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:36 AM2021-04-22T04:36:01+5:302021-04-22T04:36:01+5:30
बुलडाणा : तालुक्यातील देऊळघाटनजीक असलेले उमाळ गाव कोरोनाच्या उद्रेकामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तहसीलदार रुपेश खंडारे ...
बुलडाणा : तालुक्यातील देऊळघाटनजीक असलेले उमाळ गाव कोरोनाच्या उद्रेकामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तहसीलदार रुपेश खंडारे यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, उमाळा गावातील चार कुटुंबातील सदस्य काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आढळले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने गावात कोरोना तपासणी शिबिर घेतले होते. यातून २११ गावकऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी २० जण बाधित असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. २० एप्रिल रोजीही १९ गावकरी बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोन दिवसात उमाळा गावात ३९ जण पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, सतर्कता व दक्षता म्हणून हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे तहसीलदार खंडारे यांनी सांगितले.
--ग्रामस्थांची तपासणी--
आरोग्य कर्मचारी या गावात दाखल झाले असून, घरोघरी जात ते नागरिकांचे तापमान, पल्स रेट व शरिरातील ऑक्सिजनची पातळी तपासत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
--खैरवमध्ये ३६ जण पॉझिटिव्ह--
देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व चिखली तालुक्यांच्या सीमावर्ती भागात असलेले खैरव हे गावही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या गावात ३६ जण बाधित आढळले होते. त्यामुळे एसडीओ सुभाष दळवी, अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार आठवले, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास उगले, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात जात पाहणी केली. त्यानंतर हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असल्याची माहिती आहे.