बेशिस्त वाहतुकीचा त्रास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:14 AM2017-10-07T01:14:53+5:302017-10-07T01:15:06+5:30
शेगाव : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक सध्या वाहतुकीच्या विस्कळीत नियोजनामुळे वाहनचालकांसाठी तापदायक ठरत आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने, काळ्या-पिवळ्या आणि अँपे चालकांनी शिवाजी चौकातील अकोटकडे जाणारा संपूर्ण रस्ता ताब्यात घेतल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर अग्रसेन चौक, रेल्वेस्थानक परिसर आणि एमएसईबी चौकात खामगावकडे वाहतूक करणार्या वाहनांनी अक्षरश: वेढा घातला आहे. बेशिस्त वाह तुकीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा चौक सध्या वाहतुकीच्या विस्कळीत नियोजनामुळे वाहनचालकांसाठी तापदायक ठरत आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने, काळ्या-पिवळ्या आणि अँपे चालकांनी शिवाजी चौकातील अकोटकडे जाणारा संपूर्ण रस्ता ताब्यात घेतल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर अग्रसेन चौक, रेल्वेस्थानक परिसर आणि एमएसईबी चौकात खामगावकडे वाहतूक करणार्या वाहनांनी अक्षरश: वेढा घातला आहे. बेशिस्त वाह तुकीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असल्याचे दिसून येत आहे.
शेगाव शहराकडे विदर्भाची पंढरी म्हणून पाहिल्या जाते. यामुळे या शहरात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त येतात. शहरात प्रमुख मार्ग रेल्वे स्टेशन ते मंदिर हाच असल्याने या रस्त्यावर दिवसभर वाहनांची आणि पायी चालणार्या भक्तांची गर्दी राहते; मात्र मागील तीन महिन्यांपासून रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौकापयर्ंतचा रस्ता हा ठिकठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांनी ताब्यात घेतला आहे. शहरातील चिमाजी चौक हा एकमेव मोठा चौक आहे; मात्र या चौकात अकोट रोडवर सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपयर्ंत दहा ते पंधरा प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस् त्याच्या मधोमध उभी राहतात. उल्लेखनीय म्हणजे या चौकात वाहतूक कर्मचार्यांची रेकॉर्डवर ड्युटीही असते; मात्र ही मंडळी कर्तव्यावर हजर न राहता शहराबाहेरील रस्त्यावर वाहनांची त पासणी करताना आढळतात. अशीच परिस्थिती अग्रसेन महाराज चौकात राहते. या ठिकाणी टी-पॉईंटवर वाहने उभी केल्या जात असल्याने बसस्थानकाकडून येणार्या व बसस्थानकात जाणार्या एस टी. चालकांना बस चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. रेल्वे स्थानक ते विश्रामगृहाकडे जाणार्या मार्गावर दुभाजक लावण्यात आले आहे. यामध्ये एका मार्गावर खामगावला प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर उभी राह तात. या ठिकाणीही रेकॉर्डनुसार कर्तव्यावर वाहतूक कर्मचारी हजर असतात. विश्रामगृहाच्या वळणावर तर भयंकर स्थिती आहे. ऐन वळणावर काळ्यापिवळ्या उभ्या राहत असल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसस्थानक, शाळा नंबर ५ कडे जाणार्या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहने उभी राहतात. यामुळे या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना दररोजच्या झाल्या आहेत. एमएसईबी चौकाची स्थितीही काही वेगळी नाही. परिणामी, या सर्व ठिकाणी किरकोळ अपघात आणि वाहतूक कोंडीचा अनुभव घ्यावा लागतो. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे सर्व प्रकार स्वत:ची यंत्रणा लावून पाहावे व कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
भररत्यावर दिवसभर अवैध पाकिर्ंग
शहरातील शिवाजी चौक, अग्रसेन चौक, रेल्वेस्थानक परिसर आणि एमएसईबी चौक या परिसरातील हॉटेल्स, ट्रॅव्हल्स, बी- बियाणे, दवाखाने आणि विविध कार्यालयांसमोर अनेक वाहने दिवसभर उभी केली जातात. या अवैध पाकिर्ंगचा व्यावसायिकांना त्रास असून, अनेक वेळा पोलिसांना हा विषय सांगितल्या गेला; मात्र वाहतूक विभाग याकडे अर्थपूर्ण कानाडोळा करीत असल्याचा आरोप होत आहे.
समान न्याय देण्याची मागणी
एकीकडे शहरात ऑटो चालवून शे-दोनशे रुपये कमावून आ पल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणार्यांवर कारवाईच्या नावावर त्यांच्याकडून पैसे उकळल्या जात आहेत. त्यांच्या बेशिस्त वागणुकीवर कारवाई आवश्यकही आहे; मात्र दुसरीकडे शहरातून पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने भरचौकात रस्त्याच्या मधोमध उभी केली जात आहेत. ७ किंवा ९ प्रवासी क्षमता असलेल्या प्रवासी वाहनांमध्ये आणि अँपेमधून प्रवासी कोंबून वाहतूक सुरु आहे. या वाहनांची तपासणी किंवा कारवाईसाठी मात्र वाहतूक विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे.
भाविक-भक्तांनाही त्रास
श्रींच्या दर्शनासाठी दूर-दूरवरून वाहनांनी येणार्या भक्तांना आता पयर्ंत शहरात पोलिसांकडून कुठलाच त्रास नव्हता; मात्र मागील तीन महिन्यांपासून कागदपत्रे तपासणीच्या नावाने भक्तांना त्रास दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात मध्यप्रदेश येथून वाहनाने आलेल्या भक्तांना नवोदय विद्यालयाजवळ (ग्रामीण पो.स्टे. च्या हद्दीत) शहर वाहतूक पोलिसांनी दीड तास अडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. त्या दाम्पत्याने याबाबत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली.