दहावी, बारावीच्या निकालाबाबत अनिश्चितता कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:29 AM2020-04-18T11:29:04+5:302020-04-18T11:29:11+5:30

तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका ह्या परीक्षक व समीक्षकांकडेच पडून आहेत.

Uncertain about the SSC and HSC exam result | दहावी, बारावीच्या निकालाबाबत अनिश्चितता कायम!

दहावी, बारावीच्या निकालाबाबत अनिश्चितता कायम!

Next

- नानासाहेब कांडलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. बारावी व दहावीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका ह्या परीक्षक व समीक्षकांकडेच पडून आहेत.
कोरोणाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाउनची स्थिती निर्माण झाल्याने याबाबत शिक्षण मंडळाकडून पुढील कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. दरवर्षी साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात बारावी परीक्षेचा निकाल शिक्षण मंडळाकडून जाहीर केल्या जातो. मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावी परीक्षेचा निकाल घोषित होतो. परंतु यावर्षी बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर इंग्रजी व मराठी या विषयाच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका समीक्षकांनी शिक्षण मंडळाकडे सादर केल्यात. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउनची घोषणा झाली आणि बारावीच्या इतर विषयांच्या उत्तर पत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका ह्या परीक्षकांना समीक्षकांकडे पोहोचविता आल्या नाहीत. समीक्षकांना सुद्धा या उत्तर पत्रिका व गुणपत्रिका शिक्षण मंडळाकडे पोहोचविणे अशक्य झाले. त्यामुळे सध्या ह्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रिका समीक्षकांकडे पडून आहेत. दहावीची परीक्षा पूर्ण होण्यापूर्वीच लॉकडाउन झाले. त्यामुळे दहावीच्या उत्तरपत्रिकांची स्थिती सुद्धा बारावी प्रमाणेच आहे.

मेडिकल, इंजिनिअरिंगचे प्रवेशही लांबण्याची शक्यता
बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांचे पुढील मेडिकल व इंजिनीअरिंगचे प्रवेश अवलंबून असते; परंतु यावर्षी पुढील शिक्षणाकरीता होणाºया प्रवेश परीक्षाही पुढे ढकलल्या जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

बारावीचा निकाल केव्हा लागणार, मेडिकल व इंजीनियरिंग करिता घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा केव्हा होणार या प्रश्नाचे उत्तर सध्या कुणीही देऊ शकत नसल्याने बारावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु आलेल्या संकटाचा सामना करणे हे प्रथम कर्तव्य समजत हा विद्यार्थी वर्ग आपापल्या घरी हे संकट निवारण्याची वाट पाहात आहे.

Web Title: Uncertain about the SSC and HSC exam result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.