बेजबाबदार ग्रामसेवकांवर कारवाईचे संकेत!

By admin | Published: February 10, 2016 02:08 AM2016-02-10T02:08:48+5:302016-02-10T02:08:48+5:30

२१ गावे पाणीपुरवठा योजनेच्या पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामसेवक गावात.

Uncertainty of action taken on Gram Sevaks! | बेजबाबदार ग्रामसेवकांवर कारवाईचे संकेत!

बेजबाबदार ग्रामसेवकांवर कारवाईचे संकेत!

Next

खामगाव: तालुक्यातील २१ गावे पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा पाणीपट्टी थकीत असल्याने मागील आठ दिवसांपासून बंद आहे. वसुलीअभावी पाणीपुरवठा बंद होण्याची नामुष्की ओढावल्याने ग्रामसेवकांनी ७0 टक्के वसुली करणे गरजेचे झाले आहे. वसुलीमध्ये हलगर्जीपणा केल्यास संबंधित ग्रा.पं.च्या ग्रामसेवकावर कारवाई करणार असल्याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळाली आहे. विशेष म्हणजे याबाबत लोकमतने वसुली थकल्याबाबत वृत्त ४ फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित केले होते. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांच्या कार्यकाळात १९९५ साली लाखनवाडा प्रादेशिक २२ गावे पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. शासनाकडून सुमारे १२ कोटी रुपये सदर योजनेसाठी मिळाले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून योजनेचे काम करण्यात आले होते. शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पावरून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो. २२ गावामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या उभारून पिंप्री धनगर येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे.

Web Title: Uncertainty of action taken on Gram Sevaks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.