पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:41+5:302021-04-06T04:33:41+5:30
पिण्याचे पाणी शुद्ध असेल, तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेकडे सर्वजण लक्ष देतात. अगोदरच कोरोनासारख्या महामारीने लोकांचे जीवन ...
पिण्याचे पाणी शुद्ध असेल, तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेकडे सर्वजण लक्ष देतात. अगोदरच कोरोनासारख्या महामारीने लोकांचे जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यात अंजनी बु. येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत साचलेली घाण नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. ग्रामपंचायतला वेळोवेळी सांगूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ३ एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते समाधान पदमने, माधव शेवाळे, राम राऊत, गजानन नागोलकर, ओम ढोले, दिलीप आल्हाट, विष्णू ढोले, शंकर पायघन, सतीश पायघन, भागवत सावसुंदर, चंद्रभान जाधव, उत्तम मोरे, प्रकाश पायघन, सतीश लाड, हनुमान चंदनशिव, अरुण भोसले व इतर यांनी प्रत्यक्ष पाण्याच्या टाकीत उतरून पाहणी केली. त्या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी येत असून काही पक्षी पिण्याच्या पाण्यात मृतावस्थेत आढळले. अशा प्रकारचे पाणी कित्येक वर्षांपासून गावकऱ्यांना नाईलाजाने प्यावे लागतं आहे. त्यामुळे लहान मुलांना व वयोवृद्ध तसेच सर्वच लोकांना यापासून आरोग्यास मोठा धोका आहे, असेच जर कायम सुरू राहिले तर गावकऱ्यांना अनेक आजारांना आमंत्रण द्यावेे लागेल. हे लोकं कित्येक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ खेळत होते, हा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे.
ग्रामस्थ झाले आक्रमक
या ठिकाणी ग्रामपंचायतने याकडे प्रथम प्राधान्य देऊन लक्ष देऊन पुढील साफसफाई करणे आवश्यक आहे. या विषयावर वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करून ग्रामपंचायतला स्वच्छतेसाठी आदेश द्यावे, यानंतर जर पिण्याच्या पाण्यापासून गावातील कोणत्याही व्यक्तीस वा जीवितास धोका निर्माण झाल्यास यास सर्वस्वी ग्रामपंचायत कार्यालयात अंजनी बु. अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असा इशाराही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.