बेशिस्त पार्किंग ठरतेय डोकेदुखी!
By admin | Published: December 13, 2014 12:10 AM2014-12-13T00:10:46+5:302014-12-13T00:10:46+5:30
बुलडाणा शहरातील शासकीय कार्यालयामध्ये पार्किंगची समस्या.
बुलडाणा/खामगाव
जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये वाहनतळाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बुलडाणा, खामगाव यासारख्या मोठय़ा शहरांसह इतरही ठिकाणी वाहनतळ नसल्याने मुख्य रस्त्यांसोबतच शासकीय कार्यालये तसेच मह त्वाचे चौक, व मोठय़ा कॉम्प्लेक्स समोरील पार्किंची समस्या जटील झाली आहे.
बुलडाणा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नगर पालिका, जिल्हा परिषद यासह प्रमुख शासकीय कार्यालयामध्ये पार्किंगची समस्या आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दुसरे महत्वाचे शहर असलेल्या खामगाव शहरात बेशिस्त पार्किंगमुळे सर्व सामान्य नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अरूंद होवून वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. खामगाव शहरातील नगर पालिका, पंचायत समिती, न्यायालय, सामान्य रुग्णालय, तालुका कृषी कार्यालयात पार्किंंंगची मोठी समस्या आहे. नगर पालिका आवारात प्रशस्त पार्किंंंंग असल्यावरही मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्याचप्रमाणे नांदुरा रस्त्यावरील प्रत्येक व्यापारी गाळ्यांसमोर मोठय़ाप्रमाणात वाहने उभी राह तात. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर शहरांचीही आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात वाहनतळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नगर पालिका आणि पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने बेशिस्त वाहने उभी करणार्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, यासमस्येकडे लक्ष देण्यासाठी कुणासही वेळ नसल्याचे चित्र शहरातील वाहनांच्या बेशिस्त पार्किंगवरून दिसून येते.