बेसावध प्रशासन आणि जनताही !

By admin | Published: August 26, 2015 12:36 AM2015-08-26T00:36:47+5:302015-08-26T00:36:47+5:30

सार्वजनिक ठिकाणी ठेवल्या जाऊ शकतात बेवारस वस्तू.

Unconscious administration and public! | बेसावध प्रशासन आणि जनताही !

बेसावध प्रशासन आणि जनताही !

Next

बुलडाणा : बसस्थानकावरील निवेदक ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून वारंवार कुणी संशयित व्यक्ती बेवारस वस्तू ठेवत असेल किंवा संशयास्पद हालचाली करीत असेल, तर सजग राहा. बेवारस वस्तू व संशयित व्यक्तींबाबत त्वरित माहिती द्या अशी सूचना करतो. जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेवारस वस्तू असल्यास हात लावू नका, त्यांची माहिती कार्यालयात किंवा पोलिसांना द्या, अशी माहिती देणारे फलक अनेक ठिकाणी आढळतात; परंतु या महत्त्वाच्या सूचनेकडे कोणीच लक्ष देत नसल्याने सार्वजनिक ठिकाणी सहजपणे बेवारस वस्तू, स्फोटके ठेवली जाऊ शकतात, असे लोकमतने मंगळवारी दुपारी ११.५0 ते १ दरम्यान केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले. देशातील अनेक शहरे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. मोटारसायकली, कार, बसगाड्यांमध्ये बेवारस स्फोटके ठेवून बेमालूमपणे निघून जाण्याची त्यांची मोडस ऑपरेंडी असते. नंतर झालेल्या स्फोटांमध्ये शेकडो नागरिक मृत्युमुखी पडतात व जखमी होतात. या घटना घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासन व शासनाच्यावतीने नेहमी जनजागृती केली जाते. त्यास अनुसरून बस स्थानकावर ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून निवेदकसुद्धा बेवारस वस्तूंबाबत सावध राहण्याच्या आणि त्याबद्दल माहिती देण्याच्या वारंवार सूचना देतात; परंतु त्या सूचनेकडे सजग नागरिक म्हणून कोणीही लक्ष देत नाहीत. लोकमत चमूने मंगळवारी सकाळी ११.५0 वाजता बसस्थानकावर स्टिंग ऑपरेशन केले. या स्टिंग ऑपरेशनमधून प्रवासी, चालक, वाहक किती बेसावध आणि निष्काळजी आहेत, हे स्पष्ट झाले. लोकमत प्रतिनिधीने प्रतिकात्मक बेवारस वस्तू असलेली पिशवी प्लॅटफार्म क्रमांक ३ च्या बेंचवर ठेवली. यावेळी समोर व परिसरात अनेक प्रवासी बसलेले होते. ही पिशवी ठेवून प्रतिनिधी बाहेर निघून गेला; परंतु एकाही प्रवाशाने त्याला जाब विचारला नाही. त्यानंतर जवळपास २0 मिनिटे ती पिशवी तशीच पडून होती. त्याकडे अनेक चालक, वाहक व प्रवाशांचे लक्ष गेले; मात्र ही पिशवी कोणाची, अशी साधी विचारणासुद्धा झाली नाही. तशीच परिस्थिती जिल्हा परिषदेच्या परिसरात दिसून आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनीदेखील या पिशवीबाबत चौकशी केली नाही. यावरून सार्वजनिक ठिकाणाबाबत प्रशासन व जनताही बेसावध असल्याचे लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान उघडकीस आली.

Web Title: Unconscious administration and public!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.