उंद्री, निमगाव जि. प. पोटनिवडणुकीची आशा मावळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:41 AM2021-09-17T04:41:16+5:302021-09-17T04:41:16+5:30
त्यामुळे या दोन्ही गटाच्या पोटनिवडणुकीची आशा जवळपास संपुष्टात आली असल्याचे निवडणूक विभागातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. उंद्री जिल्हा ...
त्यामुळे या दोन्ही गटाच्या पोटनिवडणुकीची आशा जवळपास संपुष्टात आली असल्याचे निवडणूक विभागातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. उंद्री जिल्हा परिषद गटाच्या सदस्य श्वेता महाले यांनी विधानसभेची निवडणूक लढवून विजय प्राप्त केल्यामुळे या गटाचे सदस्यत्व रिक्त झाले होते. नांदुरा तालुक्यातील निमगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य मधुकर वडोदे यांचे अकाली निधन झाल्यामुळे तेथील पदही रिक्त होते. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने येथील संभाव्य पोट निवडणूक पुढे ढकलल्या जात होती. त्याबाबत निवडणूक आयोगाकडून कुठलाच निर्णय प्राप्त झालेला नाही. वास्तविक या दोन्ही गटातील मतदार आणि मतदान केंद्रही निवडणूक आयोगाने निश्चित केले होते. केवळ पोटनिवडणुकीचा मुहूर्त तेवढा ठरवणे बाकी होते. मात्र आता सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषद सभागृहाचा कालावधीही संपुष्टात येण्यास अवघे सहा महिने बाकी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या सहा महिन्यासाठी निवडणूक आयोग दोन्ही गटांची पोटनिवडणूक लावण्याची शक्यता धुसर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये या दोन्ही गटांसाठीची मतदार यादी कार्यक्रमही जाहीर झाला होता. १८ फेब्रुवारीला प्रारुप मतदार यादीही प्रसिद्ध करण्यात आली होती. सोबतच १० मार्च रोजी मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार याद्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यात उंद्री जिल्हा परिषद गटामध्ये २६ हजार २२२ मतदार व ३८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली होती. निमगावसाठी २३ हजार ७४२ मतदार संख्या व ३६ मतदान केद्र निश्चित केले गेले होते.
मात्र आता या दोन्ही गटांच्या पोटनिवडणुकीची आशाच मावळली आहे.