ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 02:38 PM2020-03-02T14:38:11+5:302020-03-02T14:38:20+5:30

हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे.

 Unemployment ax on village changers! | ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

Next

- योगेश फरपट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: भाजप सरकारने सिएसआरची मदत घेत ग्राम सामाजिक परिवर्तन हे अभियान राबविण्यास सुरवात केली होती. राज्यातील २५ जिल्ह्यामध्ये अनेक गावांचा कायापालट करण्यास अभियानाला यशही आले. मात्र अचानक हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे.
महाराष्ट्रातील मुंबईसह पश्चिम भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असला तरी विदर्भ, मराठवाडा व कोकण या भागातील ग्रामीण व आदिवासी भागात अजूनही विकासाच्या बाबतीत अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन व विविध शासकीय व निमशासकीय संस्था या भागांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. परंतू, अद्यापही शासनाच्या कल्याणकारी योजना दुर्गम व अतिमागास क्षेत्रात राहणाºया शेवटच्या घटकांपर्यंत पोचवितांना शासनाला अडचणी येत असल्याने महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रातील अग्रणी असलेल्या कंपन्या जसे, एच.यु.एल., एच.टी. पारेख, महिन्द्रा, रिलायन्स, टाटा ट्रस्ट इ. या सारख्या कंपन्या सामाजिक दायित्व प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, पोषण, कृषी, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा कंपन्यांच्या भागीदारीतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शाश्वत विकासाचे मॉडेल तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि कॉपोर्रेट कंपन्यांसोबत आॅगस्ट २०१६ मध्ये पहिली बैठक झाली. त्यातुनच निर्माण झालेल्या ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून राज्यातील १००० अतिमागास गावांची निवड झाली. याठिकाणी उच्चशिक्षित ग्राम परिवर्तकांवर सामाजिक-आर्थिक विकासाला चालना व गती देण्यावर भर देण्यात आला. बुलडाणा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याप्रमाणेच २५ जिल्हयाातील ठरावीक गावात पायाभूत सुविधा, रोजगार, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला. हे अभियान बंद होत असल्याने ३४ जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक जणावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे.


विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
अमरावती विभागातील कार्याचा आढावा घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विभागीय आयुक्तांच्या दालनात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्राम परिवर्तकांनी केलेल्या कामाचा व प्रलंबीत कामाचा आढावा घेण्यात आला होता. चार वर्षापासून अविरतपणे विकासाची धुरा सांभाळणाºया उच्चशिक्षीत ग्राम परिवर्तकांना अचानक नोकरी जाण्याचा धक्का बसला आहे. तुर्तास ३१ मार्च पर्यंत अभियान सुरु राहणार आहे. मात्र पुढे अभियानाचे काय होईल हे काहीही सांगता येणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली.

Web Title:  Unemployment ax on village changers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.