जिल्ह्यात फोफावतोय बेरोजगारीचा भस्मासुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:40+5:302021-09-02T05:13:40+5:30

बुलडाणा : कोरोना काळात येथील स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात जिल्ह्यातील ३ हजार ३०९ बेरोजगार तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली ...

Unemployment is rampant in the district | जिल्ह्यात फोफावतोय बेरोजगारीचा भस्मासुर

जिल्ह्यात फोफावतोय बेरोजगारीचा भस्मासुर

Next

बुलडाणा : कोरोना काळात येथील स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात जिल्ह्यातील ३ हजार ३०९ बेरोजगार तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. कोरोनामुळे आहे तोच रोजगार हातचा गेल्याने, रोजगारासाठी वणवण भटकणाऱ्या बेरोजगारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत साडेतीन हजार तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून, यामध्ये तरुणींचा समावेश लक्षणीय आहे.

प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या तरुणांना कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. आहे त्या नोकऱ्या हातच्या जात असतानाच, यामध्ये भरीस भर म्हणून नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भरणा आहे. मात्र, हाताला काम मिळत नसल्याने मिळेल ते काम करण्याची मानसिकता अनेकांनी बनविली असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. तिसरी लाट येण्याआधीच अनेकांनी मुंबई, पुण्याची वाट पकडली असून, तिथेही केवळ खाणे आणि राहण्यापुरतीच मिळकत मिळत असल्याने, अनेक तरुण मेटाकुटीला आले आहेत.

अशी झाली आठ महिन्यांत नोंदणी

महिना तरुण तरुणी

जानेवारी २५६ ७५

फेब्रुवारी २८५ ९१

मार्च २६९ ६०

एप्रिल २०८ ४१

मे ४७९ ५०

जून २९४ ५९

जुलै ४१४ १६१

ऑगस्ट ४१२ १५५

अनेकांनी धरली महानगरांची वाट

बुलडाणासारख्या जिल्ह्यात सुशिक्षित तरुणांसाठी पाहिजे, तेवढ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नाहीत. अशातच मिळेल, त्या पगारीवर काम करण्याची मानसिकता असलेल्यांचे कोरोनामुळे रोजगार गेलेत. तेव्हा आता परिवाराची जबाबदारी वाहून तर न्यावीच लागेल, या विचाराने गांगरून गेलेल्या अनेक तरुणांनी पुणे, मुंबई किंवा इतर महानगरात जाऊन रोजगार शोधणे सुरू केले असल्याची माहिती आहे.

वर्षनिहाय अशी होते रोजगाराची नोंदणी

वर्ष झालेली नोंदणी

२०१५ ५,९३३

२०१६ ५,४२७

२०१७ ८,२९९

२०१८ १६,०६४

२०१९ ९,०९२

२०२० ८,१४२

२०२१ ३,३०९

Web Title: Unemployment is rampant in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.