अज्ञात तापाची साथ
By admin | Published: September 12, 2014 12:11 AM2014-09-12T00:11:18+5:302014-09-12T00:11:18+5:30
शेगाव शहर व तालुक्यातील अज्ञात तापाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
शेगाव : शेगाव शहर व तालुक्यातील अनेक गावात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात तापाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून धूर फवारणीसह इतर उ पाययोजना केल्या जातात; मात्र यावर्षी धूर फवारणी केली नसल्याचा आरोप गावकर्यांकडून होत आहे. शहरासह तालु क्याच्या इतर काही भागात तापाच्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असली तरी आरोग्य विभाग अजूनही अनभिज्ञ असल्याने या तापेने अनेक भागातील असंख्य रुग्ण फणफणत असल्याचे चित्र आहे. सध्या परिसरातील अनेक रुग्ण येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे, तर सईबाई मोटे रुग्णालयसुद्धा वाढत्या रुग्ण संख्येमुळे हाऊसफुल होत आहे.