अज्ञात वाहनाची रुग्णवाहिकेला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:03 IST2018-06-27T15:01:33+5:302018-06-27T15:03:15+5:30
खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर शहरानजीक असलेल्या हनुमान मंदिराजवळ रुग्णवाहिकेला वाहनाने धडक दिल्याची घटना २७ जूनरोजी दुपारी १२.३० वाजता घडली.

अज्ञात वाहनाची रुग्णवाहिकेला धडक
खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर शहरानजीक असलेल्या हनुमान मंदिराजवळ रुग्णवाहिकेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना २७ जूनरोजी दुपारी १२.३० वाजता घडली. यामध्ये कुणालाही दुखापत नसली तरी रुग्णवाहिकेचे नुकसान झाले आहे. एम.एच.१४-०५४४ क्रमांकांची रुग्णवाहिका खामगाववरून अकोला येथे जात होती. शहरापासून काही अंतरावर असलेल्या हनुमान मंदिराजवळ समोरून येणाºया अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर नांदुरा ते खामगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ३० ते ३५ मिनिट वाहतूक विस्कळीत होवूनही वाहतूक पोलिस मात्र घटनास्थळी पोहचले नव्हते. याप्रकरणी पोलिस स्टेशनला अद्याप तक्रार दाखल नाही.