विना परवाना लाकडांची वाहतूक, वन गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:35 AM2021-03-17T04:35:10+5:302021-03-17T04:35:10+5:30

सात मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी नांदुरा-मोताळा मार्गावरील वडाळी नजीक असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळ वनविभागाने वाहनाची तपासणी ...

Unlicensed timber transportation, forest offenses filed | विना परवाना लाकडांची वाहतूक, वन गुन्हा दाखल

विना परवाना लाकडांची वाहतूक, वन गुन्हा दाखल

googlenewsNext

सात मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी नांदुरा-मोताळा मार्गावरील वडाळी नजीक असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळ वनविभागाने वाहनाची तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. सोबतच चालकाकडे वाहतुकीचा परवाना किंवा पासही आढळून आली नाही. या वाहनात लिंबाची लाकडांची अवैधरीत्या वाहतूक असल्याचे वनविभागाच्या तपासात समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली.

शेंबा शिवारातून शेख शाकीर शेख जफीर (रा. वसाडी खुर्द) याने ही लाकडे आणण्याचे सांगितले असल्याचे लाचक शेख रजीक याने सांगितले होते. प्रकरणी एमएच-२७ ए-४०११ क्रमांकाचे वाहन आणि ८ घनमीटर लाकूड वनविभागाने जप्त केले आहे. सहायक वनसंरक्षक बुलडाणा व वनपरिक्षेत्र अधिकारी खामगाव, वनपरिक्षेत्र अधिकारी मोताळा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: Unlicensed timber transportation, forest offenses filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.