रात्रीतून विनापरवाना तोडले झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:47+5:302021-08-29T04:32:47+5:30
आरेगाव रोडवर राजेश वाघमारे याचे स्टुडिओ आहे. त्याच शेजारी करंजचे झाड होते. हे झाड २७ ऑगस्टला सकाळच्या दरम्यान गावातील ...
आरेगाव रोडवर राजेश वाघमारे याचे स्टुडिओ आहे. त्याच शेजारी करंजचे झाड होते. हे झाड २७ ऑगस्टला सकाळच्या दरम्यान गावातील काही व्यक्तींनी तोडून नेले. ही बाब राजेश वाघमारे यांच्या लक्षात येताच त्यांनी दुकानात जाऊन सीसी कॅमेऱ्यातील चित्रण पाहीले असता डोणगाव येथील सहा जणांनी झाड तोडुन नेल्याचे दिसून आले. त्यांनी वनविभागाला व सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतला याबाबत माहिती दिली असता हे झाड तोडण्याची परवानगी दिली नसल्याचे उघड झाले. वनविभागाचे वनरक्षक सिंगल यांनी या तोडलेल्या झाडाचा पंचनामा केला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माने व चव्हाण यांनीही तोडलेल्या झाडाची पाहणी केली आहे.
कारवाईकडे लागले लक्ष
डोणगाव ग्रामपंचायत वसुंधरा योजनेअंतर्गत वृक्ष लावुन वृक्ष संवर्धनाचा संदेश देत असताना दुसरीकडे गावातील झाडे अशाप्रकारे अवैध पणे तोडल्या जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. झाड तोडणारावर काय कारवाई होते याकडे डोणगाव वासीयांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतीने कुणालाही झाड तोडण्याची परवानगी दिली नाही. ज्याने वृक्ष तोडला असेल, त्याच्यावर वृक्ष तोडीबद्दल कायद्यानुसार कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल.
ज्ञानेश्वर चनखोरे, ग्राम विकास अधिकारी डोणगाव.
270821\1158new doc 2021-08-27 17.19.30_3.jpg
तोडलेले झाड