बालकावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 03:01 PM2020-10-23T15:01:29+5:302020-10-23T15:01:37+5:30

Buldhana Court बुलडाणा न्यायालयाने आरोपीस विविध कलमान्वये सात वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Unnatural abuse of children; Accused sentenced to 7 years rigorous imprisonment | बालकावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास

बालकावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस ७ वर्षे सश्रम कारावास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा:  पाच वर्षाच्या बालकाशी अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी बुलडाणान्यायालयाने एका आरोपीस  सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली.
बुलडाणा शहरात ३ मे २०१९ रोजी ही घटना घडली होती. चिमुकला मुलगा हा घरासमोर खेळत असताना आरोपी सिद्धार्थ सपकाळ (२३) याने त्यास चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून त्याच्याशी अनैसर्गिक संभोग केला. दरम्यान चिमुकल्यास त्रास झाल्याने त्याने आरडा अेारड केली असता आरोपीने तेथून पळ काठला. दरम्यान चिमुकल्या मुलाने हा संपुर्ण प्रकार त्याच्या आईला सांगितला. प्रकरणी त्याच्या आईने बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी विरोधात विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास केला व बुलडाणा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या घटनेत चिमुकला मुलगा जवळपास ४८ तास डॉक्टरांच्या निगराणी खाली होता. त्यानंतर त्यास रुग्णालयातून सुटी देण्यात आली.  हे प्रकरण बुलडाणा सह जिल्हा न्यायाधिश व अतिरिक्त सत्र न्यायाधिश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले. प्रकरणात सुनावणीदरम्यान वादी पक्षातर्फे पीडित मुलाची आई, पीडित मुलगा, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय शालीकराम निकाळे व डॉ. स्वाती गोलांडे आणि तपासी पोलिस अधिकारी विनायक रामोड यांची साक्ष महत्त्वाची ठरली. उभय बाजूंचा युक्तीवाद ऐकूण बुलडाणा न्यायालयाने आरोपीस विविध कलमान्वये सात वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान दंड न भरल्यास एक महिन्याच्या शिक्षेची तरतूद निकालात आहे.
या प्रकरणात वादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. सोनाली सावजी देशपांडे यांनी बाजू मांडली तर त्यांना पोलिस कोर्ट पैरवी पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर कांबळे यांनी सहकार्य केले.

Web Title: Unnatural abuse of children; Accused sentenced to 7 years rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.