लाेणार तालुक्यात ११ सरपंचाची अविराेध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:36 AM2021-02-11T04:36:57+5:302021-02-11T04:36:57+5:30
लाेणार : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १० फेब्रुवारी राेजी निवडणूक घेण्यात आली. यापैकी ११ सरपंचांची अविराेध निवड करण्यात ...
लाेणार : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १० फेब्रुवारी राेजी निवडणूक घेण्यात आली. यापैकी ११ सरपंचांची अविराेध निवड करण्यात आली. तसेच चार गावांमध्ये निवडणुक घेण्यात आली. गाेत्रा येथे आरक्षण निघालेला सदस्य नसल्याने सरपंचपद रिक्त राहीले आहे. तसेच खळेगाव येथे सामाजिक भवनात अतिक्रमन असल्याने सरपंचपदाची निवडणुकच घेता आली नाही. तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ -सरपंच शेषराव हरिभाऊ डाेंगरे , उपसरपंच विष्णु प्रकाश सरकटे, हत्ता -सरपंच वनिता प्रमाेद जुमडे , उपसरपंच लक्ष्मी रामभाऊ पवार, बिबखेड -सरपंच वनिता राजकुमार वाघमारे , उपसरपंच संजय उत्तम राठाेड, गाेत्रा -सरपंच रिक्त , उपसरपंच सविता गजानन साबळे, हिरडव -सरपंच इंदु सुरेश भांदुर्गे, उपसरपंच शितल विजय चाटसे, पारडा प्र.लाेणार -सरपंच काैताबाई बाबुराव ढाकणे , उपसरपंच भगवान कडुजी मापारी, हिवराखंड -सरपंच निजाम काळू चाैधरी , उपसरपंच ज्याेती शरद अवसरमाेल, पांग्राडाेळे -सरपंच अनिता गजानन डाेळे , उपसरपंच संताेष माेतीराम गिऱ्हे, बिबी -सरपंच चंदाबाई उत्तम गुलमाेहर, उपसरपंच भास्कर रामदास खुळे, काेयाळी -सरपंच रेखा विलास दहाताेंडे, उपसरपंच कल्पना सहदेव दहाताेंडे, अंजनी खु. -सरपंच शिला अशाेक खराडे , उपसरपंच विजयचंद्र माणिक अवसरमाेल, पिंप्री खंदारे -सरपंच कमल मदनराव चाैधर , उपसरपंच विनाेद दत्तात्रय खंदारे, किनगावजट्टू -सरपंच शारदाबाई भगवान महाजन, उपसरपंच समाधान तुकाराम मुळे, साेनुना -सरपंच अर्चना उध्दव ढगे, उपसरपंच शिलाबाई साहेबराव वाठाेरे, गुंधा -सरपंच रतीका आश्रु फुके , उपसरपंच शिला नंदकिशाेर इंगळे यांची निवड करण्यात आली.