माेताळा तालुक्यात १३ सरपंचांची अविराेध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:19+5:302021-02-10T04:35:19+5:30

माेताळा : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचपदासाठी ९ फेब्रुवारी राेजी निवडणूक घेण्यात आली. यापैकी १३ सरपंचाची अविराेध निवड ...

Unopposed election of 13 Sarpanches in Maetala taluka | माेताळा तालुक्यात १३ सरपंचांची अविराेध निवड

माेताळा तालुक्यात १३ सरपंचांची अविराेध निवड

Next

माेताळा : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचपदासाठी ९ फेब्रुवारी राेजी निवडणूक घेण्यात आली. यापैकी १३ सरपंचाची अविराेध निवड करण्यात आली. दाेन गावात गुप्त मतदान घेण्यात आले तर एका गावात बहुमताने निवड करण्यात आली.दरम्यान, काेल्ही गाेलर येथे आरक्षणानुसार ग्रा.पं.सदस्य निवडून न आल्याने सरपंचपद रिक्त राहीले आहे.

तालुक्यातील आडविहीर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अर्चना प्रफुल्ल बढे यांची तर उपसरपंचपदी सुरेश मधुकर फाटे यांची अविराेध निवड करण्यात आली. तसेच शेलापूर खुर्द सरपंचपदी दीपाली उज्वल पाटील, उपसरपंचपदी शिलाबाइ प्रकाश पाटील, माकाेडी सरपंचपदी शशीकला युवराज तायड, उपसरपंचपदी नीळकंठ शंकर बढे, उर्हा सरपंचपदी सुनिता गजानन मिटकरी व उपसरपंचपदी वर्षा निकेशसिंह बयस, आव्हा सरपंचपदी स्वप्नील महादेव घाेंगटे, उपसरपंचपदी भगवान विसना थाटे, टेंभी सरपंचपदी किरन पुरुषाेत्तम राजपूत उपसरपंचपदी दीपक मधुकर खर्चे , टाकळी घडेकर सरपंचपदी संगिता संजयकुमार प्रधान, उपसरपंचपदी अनंता भास्कर घडेकर , तळणी सरपंचपदी वच्छलाबाई शेषराव बाेदडे तर उपसरपंचपदी जयश्री नारखेडे, दाभाडी सरपंचपदी लता सुनील तायडे, उपसरपंचपदी अरविंद भास्कर चाेपडे , जहागीरपूर सरपंचपदी प्रभाकर भगवान इंगळे तर उपसरपंचपदी जयचंद्र ज्ञानदेव चाेपडे, काेल्ही गाेलर सरपंचपद रिक्त, उपसरपंचपदी वंदना रमेश वाघ, पाेफळी सरपंचपदी शाेभा वसंतराव पालवे, उपसरपंचपदी विनाेद सीताराम सुरडकर यांची अविराेध निवड करण्यात आली.शेलापूर बु सरपंचपदी कलावती आत्माराम सावळे, उपसरपंचपदी दिनकर धाेंडू धुरंधर यांची गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्यात आली. निपाणा सरपंचपदी शारदा संताेष तांदुळकर उपसरपंचपदी प्रकाश बापुनाथ थाटे यांची गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्यात आली आहे.

सिंदखेडच्या सरपंचपदी सीमा कदम?

धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील बहुचर्चित सिंदखेड ग्रामपंचायत सरपंचपदी सीमा प्रवीण कदम यांची आज बिनविरोध निवड हाेण्याची शक्यता आहे. सिंदखेड गावकऱ्यांनी ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातून ९ सदस्यांची निवड केलेली आहे .येथील सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले आहे. सरपंच पद महिलेकडे देण्याचा नवनियुक्त सदस्यांनी निर्णय घेतला असून सीमा प्रवीण कदम यांची निवड निश्‍चित झाली आहे

Web Title: Unopposed election of 13 Sarpanches in Maetala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.