बुलडाणा तालुक्यात ८ सरपंचांची अविराेध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:36 AM2021-02-11T04:36:53+5:302021-02-11T04:36:53+5:30
बुलडाणा : तालुक्यातील १५ गावांमध्ये बुधवारी सरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यापैकी अजिसपूर येथे आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील सदस्य निवडून ...
बुलडाणा : तालुक्यातील १५ गावांमध्ये बुधवारी सरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यापैकी अजिसपूर येथे आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील सदस्य निवडून न आल्याने सरपंचपद रिक्त राहीले आहे. तसेच तालुक्यातील ८ सरपंचांची निवड अविराेध आली तर पाच ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली.तालुक्यातील अजीसपूर सरपंच रिक्त, उपसरपंच बाळाभाऊ पंढरी जगताप, भडगाव- सरपंच सुहानी ज्ञानेश्वर साखरे, उपसरपंच प्रवीण शांताराम इंगळे, देवपूर- सरपंच वर्षा आस्तीक वारे, उपसरपंच आस्तीक रमेश वारे, गुम्मी- दिपाली नंदकिशाेर हुंडीवाले, उपसरपंच विठ्ठ्ल पुंजाजी कड, सिंदखेड- मनिषा संदीप बिलारी, उपसरपंच शशीकला शालीग्राम उबरहंडे, चांडाेळ- सरपंच सुनिल देवसिंग मेहेर, उपसरपंच फैमीदाबीखा लालखा, जांब- सरपंच दिपाली गजानन सुसर, उपसरपंच शशिकला साहेबराव खंडारे, हतेडी बु.- सरपंच सरला गजानन जाधव, उपसरपंच गाैतम चांगदेव जाधव, म्हसला बु.- सरपंच सिमा गणेश भाेंडे, उपसरपंच काेमल अमाेल उबाळे, पाडळी- सरपंच विमल समाधान मुळे, उपसरपंच जयेश सुभाष पवार, पळसखेड भट- सरपंच काैशल्याबाई ज्ञानेश्वर खेडेकर, उपसरपंच मनिषा संताेष दळवी, पळसखेड नागाे- सरपंच मालती प्रवीण राठाेड, उपसरपंच हिरामण धनसिंग पवार, पांगरी- सरपंच संजय वसंतराव उबरहंडे, उपसरपंच पुनम सुरेश उबरहंडे, रायपूर- सरपंच सिमा सुनील देशमाने, उपसरपंच माे.शहजाद अब्दुल हकीम, सातगाव म्हसला- सरपंच राधा निलेश देठे, उपसरपंच प्रदीप देवीदास घुसळकर आदींची निवड झाली.