अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:32+5:302021-05-11T04:36:32+5:30

रेमडेसिविरचा काळा बाजार: कठाेर कारवाईची मागणी बुलडाणा : काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा गत काही दिवसांपासून ...

Unseasonal rains, farmers' cables | अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांची तारांबळ

अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्यांची तारांबळ

Next

रेमडेसिविरचा काळा बाजार: कठाेर कारवाईची मागणी

बुलडाणा : काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा गत काही दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असल्याचे पाेलिसांनी केलेल्या कारवाईवरून समाेर आले आहे. काेरेानाच्या काळात रेमडेसिविरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.

बुलडाणा शहरात घरफाेडी, गुन्हा दाखल

बुलडाणा : घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी चेतना नगर भागात घर फोडले आहे. ही घटना ८ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. चेतना नगर येथे उषा पांडुरंग राठोड या राहतात. त्यांचा मुलगा गोंदिया येथे आरोग्य अधिकारी आहे. त्याचे नुकतेच लग्न झाले असून, नववधूसह त्यांचे सामान गोंदियाला पोहोचवण्यासाठी उषा राठोड व त्यांचे पती गोंदियाला गेले होते. मात्र, त्यांनी घराला कुलूप लावले नव्हते. राठाेड यांनी भाच्याला पाठवले असता घराचा मागील दरवाजा उघडा दिसला़ तसेच घरातील साहित्य लंपास झालेले आढळले.

लाेणार तालुक्यात काेराेनाचा उद्रेक

लाेणार : तालुक्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तालुक्यात ८ मेपर्यंत पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन हजारांवर पाेहोचली आहे. तरीही नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग राबवण्याची मागणी

बुलडाणा : पाणी टंचाईचा सामना करताना भूजलाचा उपसा करण्याऐवजी पाणी टंचाई नसताना भूजलाची पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक मालमत्तेवर रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ भूजलाचा उपसा सुरु आहे. मात्र, तुलनेने पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. याचवेळी जिल्ह्यात सध्या ११ मेपासून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या दरम्यान इतर प्रतिष्ठानांसह सर्व सायबर कॅफेसुद्धा बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होणार आहे.

अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा गाडा!

बुलडाणा : येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात असलेल्या मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असल्याने कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा गाडा चालविण्यात येत आहे. भरती करण्यात आलेल्या १४ कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी ८ कर्मचारी अप्रशिक्षित आहेत.

हरभरा उत्पादनात घट; शेतकरी चिंतेत

सुलतानपूर : वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान संभवत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट येत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान हाेत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप साेंगणी केली नाही, त्या शेतकऱ्यांमध्येही उत्पादनातील घटीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांची साेंगणी झाली आहे. सोंगणी बाकी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

कर्जमाफीची रक्कम देण्याची मागणी

बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम तत्काळ देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अग्रणी बँक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

काेराेना लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना प्रतीक्षाच

लोणार : तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे. लसीचा साठा नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडले हाेते. सध्या १८ ते ४४ वयाेगटातील लसीकरण सुरू करण्यात आले असले तरी लसच नसल्याचे चित्र आहे.

लॉकडाऊन न करता पर्यायी मार्ग काढा

बुलडाणा : लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन न करता यातून पर्यायी मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानीचे गोपाल तायडे यांनी केली आहे.

भादाेला परिसरात वन्य प्राण्यांचा हैदाेस

बुलडाणा : तालुक्यातील भादाेला शेतशिवारात वन्य प्राण्यांचा हैदाेस सुरू आहे. रानडुकरांचे कळप मुक्त संचार करत असल्याने उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

Web Title: Unseasonal rains, farmers' cables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.