अवकाळी पावसाचा तीन तालुक्यांना फटका
By Admin | Published: March 18, 2015 01:42 AM2015-03-18T01:42:13+5:302015-03-18T01:42:13+5:30
अवकाळी पाऊसाने झाले ५0 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान.
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात ११, ते १४ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गार िपटीचा फटका ३ तालुक्यांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. या तालुक्यांमध्ये सरासरी ५0 ट क्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
यावर्षी खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर शेतकर्यांचे लक्ष रब्बी हंगामाकडे लागले होते; परंतु ११ ते १४ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यापैकी बुलडाणा, मेहकर व जळगाव जामोद तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक ३२८ हेक्टर, बुलडाणा २७५ व जळगाव जामोद तालुक्यात २५0 हेक्टरवरील िपकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जवळपास ५३५ ते ६00 म्हणजे सरासरी ५0 टक्के नुकसान झाले आहे.
मेहकर तालुक्यातील दहा गावांना गारपिटीचा तडाखा बसल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. या चार दिवसांच्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगावराजा, मोताळा तालुक्यातील आंबा, गहू, कांदा व हरभरा पिकांचे नुकसान झाले. खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तालुक्यात सोंगणीला आलेल्या गहू आणि हरभरा तसेच शेतात काढून ठेवलेले पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.