बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

By निलेश जोशी | Published: February 26, 2024 08:03 PM2024-02-26T20:03:35+5:302024-02-26T20:03:53+5:30

बुलडाणा शहरात सांयकाळी सात वाजता अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. जवळपास २० मिनिटे हा अवकाळी पाऊस पडला आहे.

Unseasonal rains in Buldhana district | बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

बुलढाणा: जिल्ह्यात अवकाळीपावसाने हजेरी लावल्याने हवेत पुन्हा गारवा निर्माण झाल आहे. दरम्यान जिल्ह्यातील घाटाखालील काही भागात तुरळकस्वरुपात गारपीट झाल्याची माहिती. जिल्ह्यात प्रामुख्याने मलकापूर, नांदुरा, बुलढाणा, देऊळगाव राजा व मराठवाड्या लगतच्या पट्ट्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.

यासंदर्भाने नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दोन दिवसापूर्वी तसा इशारा दिला होता. त्यानुषंगाने २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळीपावसाची शक्यता व्यक्त केल्या गेली होती. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिट होईल, असाही इशारा दिला गेला होता. त्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नांदुरा तालुक्यातील येरळी, खरकुंटी, पलसोडा, भोटा, हिंगणाह मलकापूर, जळगाव जामोद, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, अंढेरा परिसरासह काही भागात अवकाळी पाऊस व तुरळक स्वरुपात गारपीट झाल्याचे वृत्त आहे.

बुलडाणा शहरात सांयकाळी सात वाजता अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. जवळपास २० मिनिटे हा अवकाळी पाऊस पडला आहे. यासोबतच मराठवाड्यालगतच्या धाड परिसरातही  अवकाळी पाऊस झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजीही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी, मळणी केलेला शेतमाल व तोडणी केलेली फळे, भाजीपाला सुरक्षीत ठिकाणी साठवून ठेवावा. जेणेकरून गारपीटीुळे तो खरबा होणार नाही. यासोबतच खराब हवामान पहाता आपली गुरे सुरक्षीतस्थळी बांधून ठेवावीत.

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इतिहास
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४० वर्षपासून अवकाळी पाऊस पडण्याचा इतिहास आहे. प्रामुख्याने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हा अवकाळी पाऊस पडत असल्याच्या महसूल विभागाकडे नोंदी आहे. दरम्यान मार्च महिन्यात सैलानी यात्रेदरम्यानही अवकाळी पावसाची तसेच गारपीटी होण्याचा जिल्ह्याचा जुना इतिहास आहे.

Web Title: Unseasonal rains in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.