जिल्हा मराठी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
By admin | Published: March 16, 2017 03:11 AM2017-03-16T03:11:53+5:302017-03-16T03:11:53+5:30
बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुलडाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
बुलडाणा, दि. १५- बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण बुलडाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,शेलसूर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, नागपूर आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाचे आयोजन २६ मार्च रोजी करवंड, ता. चिखली येथे करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध सुलेखनकार गोपाल वाकोडे यांनी साकारलेल्या या बोधचिन्हातील लेखणी हे निर्मितीचे प्रतिक तर मोर हे सौंदर्य व कलेचे सूचक आहे. या दोघांचा संबंध साहित्य निर्मि तीशी असून समाजाजीवन हे त्याचे अधिष्ठान आहे, असा आशय यातून प्रतीत होतो, असे भावपूर्ण उद्गार अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काढले. या बोधचिन्ह अनावरण प्रसंगी बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. सुनील देशमुख, विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य नरेंद्र लांजेवार, स्त्रीमुक्ती संघटनेच्या डॉ. इंदुमती लहाने, शाहिणा पठाण, कवयित्री सुवर्णा पावडे- कुळकर्णी, नाट्यकर्मी अनिल अंजनकर, ज्येष्ठ कवी सुदाम खरे, रणजीत राजपूत, अरूण जैन, विवेक चांदूरकर, पंजाबराव गायकवाड, सुधीर देशमुख, प्रा. निशिकांत ढवळे, अजय दराखे, मिलिंद चिंचोळकर, प्रा. अनिल रिंढे, दिपक मोरे, विशाल पवार, इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी स्वागताध्यक्ष प्रा. सुनील देशमुख यांनी बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाचे बोधचिन्ह हे साहित्य व समाजासाठी सूचक आणि अर्थपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले.