मेहकर ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:36 AM2021-05-06T04:36:55+5:302021-05-06T04:36:55+5:30
खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार तथा पंचायतराज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी गत ५ वर्षापासून आरोग्य विभागाकडे ...
खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार तथा पंचायतराज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी गत ५ वर्षापासून आरोग्य विभागाकडे उपजिल्हा रुग्णालयाकरिता पाठपुरावा केला होता. शासनाने ८ मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला होता. कोरोना परिस्थिती लक्षात घेता राज्यातील रुग्णालयात बांधकाम, उपकरणे, यंत्रसामग्री, मनुष्यबळ पुरवून ती सक्षम बनवायची, त्यानुसार शासनाने ३० एप्रिल २०२१ च्या शासननिर्णयानुसार येथील ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयाची श्रेणी वाढवून १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले आहे. त्यासाठी बांधकाम, यंत्रसामग्री, उपकरणे व मनुष्यबळाकरिता ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मेहकर येथे उपजिल्हा रुग्णालय होणे आवश्यक होते. मेहकरपासून जिल्हा शासकीय रुग्णालय ७५ कि.मी दूर आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधेसाठी मेहकरलाच उपजिल्हा रुग्णालय होऊन उपचार झाल्यास अनेकांचे प्राण वाचतील म्हणून आ. संजय रायमुलकर यांनी ५ वर्षांपासून ही मागणी शासन दरबारी रेटून धरली होती. मागील अर्थसंकल्पात मेहकर येथे ट्राॅमा केअर युनिटसाठी ११ कोटी ६५ लक्ष रुपये मंजूर झाले होते. लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत. या बरोबरच मेहकरजवळील खंडाळा येथेसुध्दा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने १ कोटी १५ लक्ष रुपये मंजूर केले आहेत.