‘अर्बन बँके’ची फसवणूक; तीन व्यापा-यांविरुद्ध गुन्हा
By Admin | Published: August 20, 2016 02:26 AM2016-08-20T02:26:07+5:302016-08-20T02:26:07+5:30
रूईच्या गाठीचे वजन कमी असताना ते जास्त दाखवून बँकेच्या कॉटन मार्केट शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
खामगाव (जि. बुलडाणा), दि. १९ : रूईच्या गाठीचे वजन कमी कमी असताना ते जास्त दाखवून खामगाव अर्बन बँकेच्या कॉटन मार्केट शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनने १४ ऑगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
रामकिसन गोवर्धनदास भुतडा, विजयकुमार गोवर्धनदास भुतडा, राजरतन रामरतन बिन्नानी या तिन्ही आरोपींनी संगनमत करून दि खामगाव अर्बन बँक शाखा कॉटन मार्केट येथून ९९ लाख ९५ हजार कर्ज घेऊन त्यासाठी तारण म्हणून रूईच्या गाठीमध्ये वजन कमी असताना ते अधिक असल्याचे भासविले व कर्जाचा हप्ता न भरल्याने सदर बँकेने रूईच्या गाठी विक्री करून ३२ लाख १७ हजार १0५ रुपये जमा केले. आरोपींकडून १ कोटी २ लाख ३२ हजार ९२९ रुपये कर्ज थकीत आहे. कॉटन मार्केट शाखेचे मॅनेजर किशोर भारसाकळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी वरील तीनही आरोपीविरुद्ध कलम ४२0, ४0६, ३४ भादंविचा गुन्हा दाखल केला.