उडीद, तूर विक्रीचे पैसे व्यापार्यांना देऊ नये - रविकांत तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:54 PM2018-01-11T23:54:49+5:302018-01-11T23:55:23+5:30
बुलडाणा : ज्या शेतकर्यांच्या खात्यावर तूर व उडिदाचे पैसे जमा झाले आहेत, त्यांनी व्यापारी व दलालांना पैसे देऊ नये, याउपरही व्यापारी व दलाल पैसे मागण्याचा तगादा लावतील, त्यांची तमा बाळगू नका, शेतकर्यांच्या पाठीशी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी आहे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली येथील नाफेडच्या केंद्रावर व्यापारी दलाल व काही पुढार्यांनी शेतकर्यांचे सात-बारे घेऊन त्यांच्या नावावर उडीद विकून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार देऊन चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित जिल्हा उपनिबंधकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांच्या नावावर व्यापारी व दलालांनी उडीद विक्री केले, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील. त्यांनी सदर रक्कम व्यापारी व दलालांना परस्पर देऊ नये, असे आवाहनही रविकांत तुपकर यांनी केले. कोणत्याही शेतकर्यांनी व्यापारी तसेच दलालांना आपला सात-बारा देऊ नये, चिखली येथील नाफेड केंद्रावर उडीद व तूर विकून शासनाची फसवणूक केली असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली आहे.