उत्पन्न वाढविण्यासाठी अष्टसूत्रीचा वापर करा : गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:24 AM2021-06-25T04:24:40+5:302021-06-25T04:24:40+5:30
हिवरा आश्रम : सोयाबीन हे तालुक्यातील मुख्य पीक आहे. मात्र, या मुख्य पिकावरील उत्पादन खर्च खूप येतो. तो कमी ...
हिवरा आश्रम : सोयाबीन हे तालुक्यातील मुख्य पीक आहे. मात्र, या मुख्य पिकावरील उत्पादन खर्च खूप येतो. तो कमी कसा करता येईल व उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अष्टसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन नागझरीचे कृषी सहायक संतोष गायकवाड यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी मेहकरच्यावतीने बाऱ्हई येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांना सोमवारी मार्गदर्शन करण्यात आले. जमीन आरोग्य तपासणीनुसार खतांची निवड, नवीन जातीच्या वाणांची बियाणी निवड, उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, पेरणीतील अंतर, बीबीएफ तंत्रज्ञान, तणनाशके प्रकार व चक्रीभुंगा या किटकाविषयी नियत्रंण या सभेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. या सभेला गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. याच बरोबर महाडीबिडी पोर्टल ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती या विषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. सभा यशस्वी करण्यासाठी गावातील कृषी मित्र निखिल पागोरे, संतोष पागोरे यांनी सहकार्य केले.