पाटाच्या कामात मातीमिश्रित चुरीचा वापर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:31 AM2021-01-21T04:31:22+5:302021-01-21T04:31:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंढेरा : देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथे सुरू असलेल्या पाटाच्या कामात मातीमिश्रित चुरीचा वापर केला जात आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंढेरा : देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथे सुरू असलेल्या पाटाच्या कामात मातीमिश्रित चुरीचा वापर केला जात आहे. त्यामुळे पाटाचे काम त्वरित थांबविण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पैठणे यांनी केले आहे.
देऊळगाव घुबेपासून अमोना या बाजूने जाणाऱ्या पाटाच्या बाजूच्या पुलावर नाल्यांचे काम सुरू आहे. सध्या रेतीचा लिलाव नाही. त्यामुळे कुठल्याही नदी-नाल्याची मिळेल त्या मातीमिश्रित रेती आणि चुरीचा वापर करण्यात येत आहे. यातच या कामावर पाण्याचा अभाव असून, हे काम कमी दर्जाचे होत असून, बिल काढण्याच्या धावपळीत फक्त काम पूर्ण करण्यात येत आहे. पाटाचे पाणी शेवटच्या टोकावर पोहोचणार की नाही, याचीही शाश्वती नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून संबंधित ठेकेदाराला योग्य ती समज देऊन, त्याचे नाव काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत संबंधित कंत्राटदार कीर्तने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.