अवैधरीत्या स्फोटकांचा वापर; दोघांना अटक
By Admin | Published: July 15, 2017 12:33 AM2017-07-15T00:33:55+5:302017-07-15T00:33:55+5:30
धाड : म्हसला बु. गावानजीक अवैधरीत्या डिटोनेटर्स (स्फोटकांसह) ड्रिल मशीनसह नाल्यामध्ये खडक फोडणाऱ्या बोअरिंग ट्रॅक्टरवर १४ जुलै रोजी धाड पोलिसांनी कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : म्हसला बु. गावानजीक अवैधरीत्या डिटोनेटर्स (स्फोटकांसह) ड्रिल मशीनसह नाल्यामध्ये खडक फोडणाऱ्या बोअरिंग ट्रॅक्टरवर १४ जुलै रोजी धाड पोलिसांनी कारवाई केली.
यावेळी रोडलगत नाल्यात खडकामध्ये ड्रिल मशीनद्वारे होल करून त्यात जिलेटीन कांड्या भरताना पोलिसांनी आरोपी गणेश ताठे व साहेबराव ताठे रा.जांब यांना ताब्यात घेऊन भारतीय स्फोटके पदार्थ नियम १९०८ कलम ४, ५, ६ कलम २८६, ३४ नुसार कारवाई केली. अधिक तपास धाड पोलीस करीत आहेत.