उद्योगासाठी वापरला जाणारा ऑक्सिजन आरोग्यासाठी वापरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:59+5:302021-04-22T04:35:59+5:30
राज्यामध्ये कोरोना महामारीने सर्वदूर आपले हातपाय पसरले आहेत. प्रत्येक घरात कोरोनाचा रुग्ण सापडत आहे. कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू ...
राज्यामध्ये कोरोना महामारीने सर्वदूर आपले हातपाय पसरले आहेत. प्रत्येक घरात कोरोनाचा रुग्ण सापडत आहे. कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाल्याने उपलब्ध आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. ज्या प्राणवायूच्या भरवशावर प्रत्येक सजीव जगतो तोच प्राणवायू आता मिळेनासा झाला आहे. ऑक्सिजनची अत्यंत गरज असताना सुद्धा ते मिळत नाही. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रूग्ण ऑक्सिजनअभावी मृत्यूमुखी पडलेले आहे. एकीकडे रेमडेसिविर या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा, तर दुसरीकडे ऑक्सिजन मिळत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू हाेत आहे. परंतु, शासनाकडून रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजन पुरविण्याबाबत आतापर्यंत तरी शासन व्यवस्था अपुरी पडत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. खासगी डॉक्टरांसह शासकीय रुग्णालयातही ऑक्सिजन सिलिंडरची प्रचंड वाणवा निर्माण झालेली आहे. दरम्यान, राज्यभरात उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येते. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे कारखाने असून ऑक्सिजन केवळ उद्योगासाठी वापरला जातो. सद्यस्थितीत असणाऱ्या कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा कितीतरी पटीने उद्योगात ऑक्सिजन निर्मिती होत असल्याने उद्योग इंडस्ट्रीमध्ये निर्मित होणारा ऑक्सिजन हा आरोग्याकडे वळती करून राज्यभरातील गरजू कोरोना बाधित व इतर रुग्णांसाठी वापरण्यात यावा, अन्यथा या साथीच्या रोगात मृत्यूचे थैमान पहावल्या जाणार नाही असा इशारा सुद्धा आ.महाले यांनी दिला आहे.