झोपडपट्टीतील पक्क्या घरांचा अवैध व्यवसायासाठी वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:37 PM2020-12-15T12:37:53+5:302020-12-15T12:37:59+5:30

Khamgaon News चांदमारीरोड आणि घाटपुरीरोड परिसरातील झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे.

Use of permanent houses in slums for illegal business! | झोपडपट्टीतील पक्क्या घरांचा अवैध व्यवसायासाठी वापर!

झोपडपट्टीतील पक्क्या घरांचा अवैध व्यवसायासाठी वापर!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव  : शहरात २१ अधिकृत झोपडपट्टी असून, अनधिकृत झोपडपट्ट्यांची संख्या १५ आहे. अधिकृत झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या काही लाभार्थ्यांनी अनधिकृत झोपडपट्टीतही कब्जा केला आहे. अनधिकृत झोपडपट्टीतील जागा तसेच त्यावरील इमल्यापोटी एक ते दीड हजार रुपये भाडे वसुलीही काही जणांकडून केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहेे. 
खामगाव शहरातील बेघर नागरिकांचे सर्वेक्षण करून काही वर्षांपूर्वी ग्रामीण पोलीस स्टेशनरोड, शेलोडीरोड, घाटपुरीरोडवर पक्क्या सदनिका उभारण्यात आल्या. या सदनिकांमध्ये पात्र लाभार्थ्यांऐवजी दुसऱ्यांनी घरं बळकावले  आहेत. काहींनी ही घरे भाड्याने दिली आहेत. याकडे खामगाव पालिका प्रशासनाचे  दुर्लक्ष होत आहे. चांदमारीरोड आणि घाटपुरीरोड परिसरातील झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. 

दुसऱ्यांनी बळकावली झोपडपट्टीतील घरे ! 
n खामगाव शहरातील बेघर नागरिकांसाठी काही दिवसांपूर्वी तीन ठिकाणी पक्की घरे उभारण्यात आली. याठिकाणी जाण्यास काही पात्र लाभार्थ्यांनी नकार दिला. त्यानंतर ‘मनी, मसल आणि राजकीय पॉवर’च्या बळावर पक्क्या झोपडपट्टीतील घरे बळकावली आहेत. ही घरे चक्क भाड्याने दिली.  
n  याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनरोड, रावण टेकडी, घाटपुरीरोड आणि चांदमारीरोडवरील पक्क्या घरांचा अनधिकृत व्यवसायासाठीही वापर होत असल्याची ओरड होत आहे.

Web Title: Use of permanent houses in slums for illegal business!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.