खामगाव पालिका आवारातच प्लास्टिक पिशव्यांचा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 04:49 PM2019-09-21T16:49:10+5:302019-09-21T16:49:28+5:30

काही जणांकडून चक्क पालिकेच्या आवारातच प्लास्टिक बंदीला हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येते.

Use of plastic bags in Kamgaon Municipal premises! | खामगाव पालिका आवारातच प्लास्टिक पिशव्यांचा वापर!

खामगाव पालिका आवारातच प्लास्टिक पिशव्यांचा वापर!

Next

खामगाव: ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेतंर्गत खामगावात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, काही जणांकडून चक्क पालिकेच्या आवारातच प्लास्टिक बंदीला हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येते.
शासनस्तरावरून ११ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात येत आहे. यामोहिमेतंर्गत स्वच्छतेसोबतच प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, आरोग्य विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारीच प्लास्टिक बंदीला हरताळ फासत असल्याचे गुरूवारी ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले. एकदाच वापराच्या तसेच प्लास्टिक पिशव्याच्या वापरासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न होत असतानाच, आरोग्य विभागाकडून ब्लिचिंग पावडर वितरीत करण्यासाठी चक्क एकदाच वापराच्या प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यात येत आहे. आरोग्य विभागातील काही अधिकारीच प्लास्टिक बंदीला हरताळ फासत असल्याचे वेळोवेळी दिसून आले. या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ स्तरावरून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसून येते.


प्लास्टिक बंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी चार पथकं गठीत करण्यात आली. एक विशेष पथकही गठीत करण्यात आले आहे. प्लास्टिक बंदीचं उल्लघंन करणाºया कुणाचीही गय केली जाणार आहे.
- धनंजय बोरीकर
मुख्याधिकारी, खामगाव.

Web Title: Use of plastic bags in Kamgaon Municipal premises!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.