शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 05:49 PM2018-09-30T17:49:44+5:302018-09-30T17:50:09+5:30
खामगाव: तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
- देवेंद्र ठाकरे
खामगाव: तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
खामगाव तालुक्यात उर्दु माध्यमाच्या १८ शाळांसह जिल्हा परिषदेच्या एकूण १४४ शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षक, सहाय्यक शिक्षक तसेच मुख्याध्यापक अशी ८४८ पदे मंजुर आहेत. यातील ७६६ पदे भरण्यात आली असून ८२ पदे अद्याप रिक्त आहेत. याचा परिणाम मुलाच्या भवितव्यावर होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळण्यात यामुळे व्यत्यय येत आहे. शिक्षकांची कारकुनी कामे वाढली आहेत. शासनाच्या विविध योजना, अभियानाचा ताणही शिक्षकांवर राहतोच. यामुळे तसेही विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा इतर कामांमध्येच शिक्षकांचा जास्त वेळ जातो. अनेक शाळांवरील मुख्याध्यापक पद रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. तसेच मुख्याध्यापक पदाचे कामकाज शिक्षकांना करावे लागत असल्याने अशी कामे करणाऱ्या शिक्षकांना अध्यापन करण्यास वेळ मिळत नाही. खामगाव तालुक्यात डोंगराळ भागात राहणाºया वाड्या-वस्त्यांमधिल गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा पाहिजे त्या प्रमाणात मिळताना दिसत नाही. याकडे शिक्षण विभागातील वरिष्ठांनी लक्ष देऊन रिक्त पदे भरण्याची गरज आहे.
अधिकारी कर्मचाऱ्यांची पदेही रिक्त
खामगाव पंचायत समिती शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे. विस्तार अधिकारी ही चारही पदे रिक्त आहेत. खामगाव येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार असलेलया जी.डी. गायकवाड यांच्याकडे शेगाव येथील विस्तार अधिकारी पदाचाही प्रभार आहे. यामुळे तालुक्यात शिक्षण विभागाचे कामकाज प्रभावित होत आहे.