अमडापुरात २०० जणांना दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:13+5:302021-05-12T04:35:13+5:30
गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग ग्रामीण भागातही वाढत आहे़ काेराेना संसर्ग राेखण्यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात ...
गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग ग्रामीण भागातही वाढत आहे़ काेराेना संसर्ग राेखण्यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत़ त्याचप्रमाणे लसविषयी जनजागृती सुद्धा सुरू आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील ग्रामस्थ ही लसीबाबत जागृत झाले आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. वाढत्या गर्दीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत होती.
ही तारांबळ बघता आणि नागरिकांचे हाल बघता अमडापुरच्या सरपंच वैशाली संजय गवई, जि.प. सदस्य शैला पठाडे , अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमित वानखेडे, तथा येथील पत्रकार वसंतराव शिरसाट, माधव धुंदाळे , व प्रताप कौसे यांनी १० मे रोजी वैद्यकीय अधिकारी डाॅ़ मनीषा खरात, डॉ़ बाविस्कर यांना होत असलेल्या गर्दीबाबत व नियोजनाच्या अभावाबाबत उपायोजना व सूचना केल्या़ त्या सूचनेचे पालन ११ में रोजी प्रत्यक्षात करून आरोग्य सहाय्यक अनिल लोखंडे, व आरोग्य कर्मचाऱ्यांनी एक वाजेच्या आत २०० नागरिकांना लस दिली़ यावेळी केंद्रावर कुठलीही गर्दी उसळली नाही़ अमडापूर प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांची लाेकसंख्या पाहता जिल्हा आरोग्य विभागाने २०० पेक्षा जास्त म्हणजेच किमान ५०० डाेसचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे़