निपाणा येथे १६० नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:45+5:302021-04-13T04:32:45+5:30
तालुक्यातील निपाणा येथील सरपंच शारदा तांदुळकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने येथील प्राथमिक शाळेत १० एप्रिल रोजी लसीकरण शिबिराचे आयोजन केले ...
तालुक्यातील निपाणा येथील सरपंच शारदा तांदुळकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने येथील प्राथमिक शाळेत १० एप्रिल रोजी लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. या लसीकरण मोहिमेचा सरपंच शारदा तांदुळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. तसेच या लसीकरणासाठी ग्रामपंचायत स्तरावरून याची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. मोहिमेत गावातील पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जवळपास १६० नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी सरपंच शारदा संतोष तांदुळकर यांच्यासह उपसरपंच प्रकाश थाटे, ग्रामपंचायत सदस्या छाया तायडे, सचिव एम.पी. शिंदे, तलाठी सुरेश जाधव यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव देवीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंतकुमार खाडे, आरोग्य पर्यवेक्षिका एस.एस. चोपडे, आरोग्य सेविका मंजुश्री चव्हाण, आरोग्य सेविका आशा भोपळे, डाटा ऑपरेटर विजय भोपळे, आरोग्य सेवक दत्ता जाधव, आशा सेविका गीता तांदूळकर, आरोग्य सेवक आर.के. घोडके, पवन पाटील यांनी परिश्रम घेतले.