साखरखेर्डा येथे ९७० जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:38 AM2021-09-05T04:38:22+5:302021-09-05T04:38:22+5:30

स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एस. ई. एस. हायस्कूलमध्ये जिल्हा परिषद सदस्य राम जाधव यांनी लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. ...

Vaccination of 970 people at Sakharkheda | साखरखेर्डा येथे ९७० जणांचे लसीकरण

साखरखेर्डा येथे ९७० जणांचे लसीकरण

Next

स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एस. ई. एस. हायस्कूलमध्ये जिल्हा परिषद सदस्य राम जाधव यांनी लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. पाच बूथ स्थापन करुन १८ ते ४५ वयोगटातील, ४५ ते ६० आणि त्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. सोशल मीडिया आणि प्रत्येक गावात दवंडी देऊन लसीकरणाची माहिती देण्यात आली होती. साखरखेर्डा, सवडद, मोहाडी, राताळी, गुंज, शिंदी, पिंपळगाव सोनारा या गावातील युवकांनी, व्यक्तींनी आणि महिलांनी भाग घेतला. जिल्हा परिषद सदस्य राम जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप सुरुशे, डॉ. प्रियंका अग्रवाल, डॉ. स्वाती ठोसरे, डॉ. प्रशांत वायाळ, डॉ. राखी सुरुशे, डॉ. जयश्री शेळके, गोपाल मानतकर, स्वाती इंगळे, पी. टी. गिऱ्हे, कविता इंगळे, मीनाक्षी गवई, स्वाती डोंगरदिवे, प्रमिला कोव्हे, अर्चना कऱ्हाळे, दीपाली पिठलोड या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य करीत लसीकरण केले. तर यावेळी सरपंच दाऊत कुरेशी, माजी सभापती राजू ठोके, माजी सरपंच कमळाकर गवई, माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, पीएसआय सचिन कानडे यांनी नागरिकांना शिस्तीत व कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य केले.

Web Title: Vaccination of 970 people at Sakharkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.