जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला येणार वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:57 AM2021-05-05T04:57:11+5:302021-05-05T04:57:11+5:30
दरम्यान, लसीचा साठा कमी असल्याने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर ४५ वर्षांवरील व्यक्तींचे सुरू असलेले लसीकरण ४ ...
दरम्यान, लसीचा साठा कमी असल्याने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर ४५ वर्षांवरील व्यक्तींचे सुरू असलेले लसीकरण ४ मे रोजी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे या केंद्रावरून ४५ वर्षांवरील व्यक्तींना माघारी परतावे लागले होते.
मात्र आता लसीकरण मोहीम ५ मेपासून पुन्हा वेग घेणार असल्याचे संकेत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे १२ हजार १०० आणि कोव्हॅक्सिन लसीचे १२ हजार डोस ५ मे रोजी पहाटे उपलब्ध होत आहेत. हे सर्व डोस तातडीने लसीकरण केंद्रांवर पाठविण्यात येऊन दुपारी लसीकरण सुरू होण्याची शक्यता आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केली.
--लसीकरणाचा चौथा टप्पा महत्त्वाचा--
लसीकरण मोहिमेतील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्याचा चौथा टप्पा महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ७४ टक्के नागरिक हे १८ ते ४४ वयोगटातील आहेत. प्रामुख्याने रोजगारासाठी तथा कामासाठी हा वर्ग घराबाहेर पडलेला असतो. त्यामुळे त्यांना संक्रमणाचा धोका तुलनेने अधिक आहे. या वर्गाचे लसीकरण प्राधान्याने झाल्यास जिल्ह्यातील संक्रमणाचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९.२५ टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरण झालेले आहे.