अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २८४ जणांना दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:33 AM2021-03-19T04:33:49+5:302021-03-19T04:33:49+5:30
अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला २८ खेडे जोडलेले आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत वाढत्या कोरोना विषाणू आजारावर मात करण्यासाठी ...
अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला २८ खेडे जोडलेले आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत वाढत्या कोरोना विषाणू आजारावर मात करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना सुरू आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना लसीकरणाला १० मार्चपासून सुरुवात झाली आहे. १८ मार्चपर्यंत २८४ जणांना लस देण्यात आली असून ही मोहीम प्रत्येक दिवशी सुरू राहणार आहे. यासाठी ४५ ते ६० वर्षापर्यंत दुर्धर आजार असलेल्या नागरिकांनी व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस घेण्यासाठी अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावे, जेणेकरून आपण कोरोनावर मात करू. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्येकाने तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा. वेळोवेळी हात धुवावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व सॅनिटायझर वापरावे, असे आवाहन अमडापूर प्राथमिक केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा खरात, आरोग्य सहायक हमले, लोखंडे यांनी केले आहे.